Prachin Va Madyayugin Bharatacha Itihas By Vastunishth Prashanchya Swarupat (प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहास – वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या स्वरूपात)
Prachin Va Madyayugin Bharatacha Itihas By Vastunishth Prashanchya Swarupat (प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहास – वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या स्वरूपात)
Couldn't load pickup availability
राज्यसेवा पूर्व परीक्षा,नेट-सेट परीक्षा व विविध स्पर्धा परीक्षांमधील प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर विचारल्या जाणाऱ्या वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या परिपूर्ण तयारीसाठी…📚📖📘
आयोगाच्या बदललेल्या धर्तीनुसार व वाढत्या काठिण्यपातळीनुसार प्रश्नांची रचना बिटवीन द लाइन्स अन् कॉम्प्लिकेटेड वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी…📚📖📘
प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहास
वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या स्वरूपात 📚📖📘
के’सागरीय…..
‘भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ’हा राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या पहिल्या पेपरमधील एक घटक विषय.’भारताचा इतिहास’ ही संकल्पना व्यापक असून त्यामध्ये प्राचीन भारताच्या इतिहासाचा,मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचा व आधुनिक भारताच्या इतिहासाचा समावेश होतो.
या घटकविषयाच्या मथळ्यातील राष्ट्रीय चळवळीचा स्वतंत्र उल्लेख भारताचा इतिहास या घटकांतर्गत आधुनिक भारताच्या इतिहासास दिले जाणारे महत्त्व अधोरेखित करतो. आधुनिक भारताच्या इतिहासाचे महत्त्व लक्षात घेऊन यापूर्वीच ‘आधुनिक भारताचा इतिहास-वस्तुनिष्ठ स्वरूपात’हे व्ही.बी.पाटील यांच्या लेखणीतून साकारलेले पुस्तक प्रकाशनाने प्रकाशित केले आहे.
Share
