Payapit Samajwadi By Pannalal Surana (पायपीट समाजवादासाठी)
Payapit Samajwadi By Pannalal Surana (पायपीट समाजवादासाठी)
Couldn't load pickup availability
संसदीय व सत्याग्रही लोकशाही मार्गाचा अवलंब करून आणि व्यक्तिस्वातंत्र्याला केंद्रस्थानी ठेवून आर्थिक समतेच्या पायावर समाजाची निर्मिती करण्याची आवश्यकता व इष्टता प्रतिपादन करणारी विचारसरणी म्हणजे लोकशाही समाजवाद. त्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावणार्या एका सच्चा कार्यकर्त्याचा हा जीवन प्रवास. आयुष्यात व्यक्तिगत जीवनापेक्षा सार्वजनिक जगण्याला प्राधान्य दिलं गेलं की, व्यक्तिगत असं फारसं काही उरत नाही. अशा जगण्याची कहाणी
म्हणजे ही आत्मकथा होय. देशाच्या भल्यासाठी चालवलेल्या चळवळीचा इतिहास म्हणून ती जशी आपल्या समोर येते तशीच ती या चळवळीत तन-मनाने एकरूप झालेल्या सच्चा कार्यकर्त्याचे दर्शनही घडवते. त्याचबरोबर विचारांवर निष्ठा असणं म्हणजे काय याचं भान देणारी ही कहाणी माणूस म्हणून वेगळी मूल्येही आपल्यामध्ये रुजवते. त्यासाठी ती वाचायलाच हवी.
Share
