Patras Karan ki By Sandeep Wakchoure (पत्रास कारण की)
Patras Karan ki By Sandeep Wakchoure (पत्रास कारण की)
Couldn't load pickup availability
आजच्या महाराष्ट्रातील ‘दृष्टी’ असणारे शिक्षणतज्ज्ञ म्हणून तुम्ही आम्हाला ‘प्रिय’ आहात. हे प्रिय असणं वरवरचं किंवा तोंडदेखलं नाही. ज्यांच्या कामाविषयी आदर वाटावा, ज्यांच्याविषयी काळजातून प्रेमाचे झरे पाझरावेत, अशी तुमच्यासारखी माणसं आजच्या काळात खूपच दुर्मीळ झालीत. जेव्हा जेव्हा समाजाला ग्लानी येईल तेव्हा ‘त्याचा’ अवतार अटळ असतो, असं भगवान श्रीकृष्णानं सांगितलं; मात्र समाज जेव्हा जेव्हा अधोगतीचं टोक गाठतो तेव्हा तुमच्यासारखे काही विचारवंत लेखणीचं शस्त्र करत समाजाच्या डोळ्यावरील झापड दूर करण्यासाठी सरसावतात. आपल्या समाजरचनेच्या अधोगतीचं मूळ शिक्षणव्यवस्थेत आहे, हे तुमच्यासारख्या प्रज्ञावंत शिक्षकानं हेरलं आणि जागरुकतेचं व्रत स्वीकारलं. शिक्षणावर आधारित अल्पकाळात चौदा पुस्तके लिहून तुम्ही हा धोका वाचकांच्या समोर मांडला. इथली राज्यव्यवस्था त्याची दखल घेईलच, असं नाही! पण निदान तुम्ही चोचीत पाणी घेऊन जंगल विझवणाऱ्या चिऊताईच्या गटात सामील झालात. प्रस्तुत पुस्तक हे शिक्षणव्यवस्थेवरचं नसलं तरी विविध क्षेत्रातील लोकांना, प्रामुख्यानं पालकांना जागं करणारं आहे. ही ‘जागल्या’ची भूमिका समाजप्रबोधनाचाच भाग आहे. आपले हे विचार थेट काळजाला भिडतात आणि त्यातून लोकशिक्षणाचा मार्ग सुलभ होतो. यातील काही पत्रे वाचकांच्या मनाला स्पर्शन जातील, विचार करायला भाग पाडतील. भिल्ल अंधारात एखाद्या काजव्याचं टिमटिमणं किती आल्हाददायक आणि आश्वासक असतं याची प्रचिती घडवणारं हे लेखन आहे. तुमच्या प्रेमाचा ओलावा वाचकांना ज्ञानसाधनेचा मार्ग दाखवतो. स्नेह आहेच. तो अधिक वृद्धिंगत होत जाईल. घनश्याम पाटील लेखक, प्रकाशक आणि संपादक
Share
