Paschim Aghadiwar Samsum By Prof Satyabodh Hudalikar
Paschim Aghadiwar Samsum By Prof Satyabodh Hudalikar
Couldn't load pickup availability
महायुद्धानंतर गाजलेल्या 'ऑल क्वाएट ऑन द वेस्टर्न फ्रंट' या पुस्तकाचा अनुवाद आहे. हा अनुवाद मुळचे जर्मन लेखक एरिश् मारिया रेमार्क यांनी लिहिलेल्या 'इम् वेस्टेन निश्टस नॉयेस' या मूळ जर्मन पुस्तकावरुन सत्यबोध हुदलीकर यांनी केलेला मराठी अनुवाद म्हणजेच 'पश्चिम आघाडीवर सामसूम' पहिल्या महायुद्धात जर्मनीच्या वतीने रेमार्क याने प्रत्यक्ष भाग घेतला होता. रेमार्क हा मध्यमवर्गीय जर्मन तरुण होता. पहिल्या महायुद्धाची विफलता त्याला पटली आणि त्याने या कादंबरीद्वारे युद्धविरोधाचा सूर छेडला होता. 1930 साली त्याने ही कादंबरी दोन आठवड्यात लिहिली. या कादंबरीमुळे जर्मनीत वादळ निर्माण झाले आणि त्यावेळी पुढे येत असलेल्या नाझी पक्षाने या कादंबरीच्या प्रती जाळल्यासुद्धा. 1930 च्या दशकात या कादंबरीच्या लक्षावधी प्रती काढल्या आणि मराठीसह अनेक भाषांत त्याचे भाषांतर झाले. रेमार्कला जर्मनी सोडून अमेरिकेत स्थायिक व्हावे लागले. ही कादंबरी पूर्णपणे युद्धविरोधी होती आणि युद्धाचा व्यर्थपणा पटवणारी होती. जगाच्या इतिहासात ज्या पुस्तकांनी इतिहासाला वेगळे वळण लावले त्यापैकी ही एक कादंबरी आहे.
Share
