Skip to product information
1 of 1

Parak By Amar Gore (पारक)

Parak By Amar Gore (पारक)

Regular price Rs. 425.00
Regular price Rs. 500.00 Sale price Rs. 425.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

अमर गोरे यांची ‘पारक’ ही कादंबरी गावखेड्यात उनाड बागडणाऱ्या पौगंडावस्थेतल्या मुलाच्या भावविश्वाचे चित्रण करते. गावस्तरावरील वाडीतील बहुविध जगण्याचे अतिशय तरल आणि सेंद्रिय अनुभव देणारे हे लेखन आहे. कोवळ्या वयातील मुलाचे कुतूहल, निरागसपणा, अल्लडपणा आणि त्यातून तयार होणारे नायक आणि त्याच्या मित्रांचे फंटीमय जग या कादंबरीत रंगांच्या विविध छटांसारखे कागदावर सांडत जाते. तर, वाडीतील जगण्यातले अंतर्गत मतभेद-विरोधाभास, त्यातून होणारा संघर्ष, निवेदकाची आई, मोठा भाऊ, बाप, बापाचे गावातले कारभारपण, त्यांच्या आपसांतल्या विवंचना अशा अनेक घटनांचे चिरकालीन पडसादही कादंबरीभर उमटत राहतात.
झाडे, वारा, पाखरे, यांसारख्या कित्येक निसर्गघटकांचे, भवतालाचे असंख्य आवाज आणि त्यांच्याशी समरस होऊन गेलेल्या नायकाच्या कोमल, हळव्या भावविश्वाचा नवानाद आणि त्याचा जैविक असा गंध अविरत आपला माग काढत राहतो. आपल्या अनुभवाला, आपल्या भवतालाला कोणतेही अस्तर न लावता केलेल्या या लेखनात नैसर्गिकपणाच्या अनेक खुणा पानोपानी जाणवतात. हे ‘पारक’ या कादंबरीचे वेगळेपण आहे.
कादंबरीच्या केंद्रस्थानी असलेल्या नायकाच्या बालमनाची नाडी सतत थडथडत ठेवणारी आणि विस्मरणात निघालेल्या खेड्यातल्या उघड्या जगाचे अनोखे दर्शन घडवणारी ही महत्त्वाची कादंबरी आहे.- कृष्णात खोत

View full details