Pani By Achyut Godbole, Avinash Sardesai (पाणी । लेखक- अच्युत गोडबोले, अविनाश सरदेसाई)
Pani By Achyut Godbole, Avinash Sardesai (पाणी । लेखक- अच्युत गोडबोले, अविनाश सरदेसाई)
Couldn't load pickup availability
पाणी । लेखक- अच्युत गोडबोले, अविनाश सरदेसाई
पाने - ४९६
माणसाच्या जीवनाला व्यापणारे दोन विषय म्हणजे हवा आणि पाणी! या दोन्हींशिवाय माणूस क्षणभरही जगू शकत नाही. पंचमहाभूतांपैकी पाणी या भुतानं माणसाला कसं झपाटलं आहे, याची रंजक गोष्ट म्हणजे हे पुस्तक! या पुस्तकात पाण्याचा विज्ञान, इतिहास, संस्कृती, कला आणि दैनंदिन जीवनाशी असलेला अद्भुत संबंध रोचक व माहितीपूर्ण पद्धतीनं मांडला आहे.
पाण्याविषयीच्या पाश्चात्त्य आणि भारतीय कल्पना, नद्या आणि हिमनद्या, समुद्र आणि समुद्री जीव, मान्सून आणि हवामान, शरीर आणि अंघोळ, खाद्यपदार्थ, जलवाहतूक, जलरंग, अंघोळ न केलेल्या माणसाची गोष्ट, पाण्यानं रोग बरे करण्याची विचित्र पद्धत, पाण्यावरची वाद्यं आणि यंत्रं, पृथ्वीवरचं आणि इतर ग्रहांवरचं पाणी, पाण्याचं व्यवस्थापन आणि प्रदूषण... आणि अर्थात, या सगळ्यांमधलं विज्ञान; अशा सर्व विषयांची असलेली अद्भुत गुंफण म्हणजे हे पुस्तक!
Share
