Skip to product information
1 of 1

Palakho, Tumchya Palyasathi By Dr. Yashwant Patil (पालकहो, तुमच्या पाल्यासाठी - डॉ. यशवंत पाटील )

Palakho, Tumchya Palyasathi By Dr. Yashwant Patil (पालकहो, तुमच्या पाल्यासाठी - डॉ. यशवंत पाटील )

Regular price Rs. 70.00
Regular price Rs. 70.00 Sale price Rs. 70.00
Sold out
Shipping calculated at checkout.
Author
Publication
Language version
Quantity

जागतिकीकरणाचा रेटा आणि बदलती जीवनशैली या सर्वाचा परिणाम म्हणून पालकत्वाची जबाबदारी अवघड वळणे घेत आहे. नवे-नये ताण, अनुत्तरित प्रश्न या वळणांवर आकाराला येत आहेत. एक अंतहीन प्रवासच जणू पालकत्वाने सुरू केला आहे. 'माध्यमकेंद्री' (Media Centred) समाज बनल्यामुळे यात असहाय्यतेची नवी भर पडते आहे. अस्वस्थता वाढते आहे. आर्थिकदृष्ट्या दुःस्थितीत आणि सुस्थितीत असणाऱ्या दोहोंनाही सारख्याच पातळीवर असहाय्यता भोगावी लागते हे आणखी अनाकलनीय वास्तव. जोपर्यंत कौटुंबिक जीवन साधं-सरळ होतं तोपर्यंत पालकत्वाच्या तणावाचं टोक आजच्याइतकं अणकुचीदार नव्हतं. आज या अणुकुचीदारपणातून कोण कसा खरचटला जाईल बाची शाश्वती नाही. पालक-पाल्य नात्यातील गंमत जिथे हरवली आहे, असे शेकडो परिवार समाजात पाहायला मिळतात. तज्ज्ञ, शिक्षणसंस्था, पालक संघ, नियोजनकर्ते दर १५-२० वर्षांनी 'जुनी' होत चाललेली पुढची पिढी हे सर्वच हतबलतेकडे झुकल्यासारखे वाटतायंत. या पार्श्वभूमीवर नासिकचे लोकप्रिय 'सर' यशवंत पाटील यांनी 'जबाबदार पालकत्व' या संकल्पनेला विविध पैलूंनी उलगडून दाखविण्याचा वस्तुनिष्ठ प्रयत्न केला आहे. मध्यंतरी महाराष्ट्रात या विषयावर भरपूर चर्चा झाली. रेव्ह पार्थ्या किंवा आत्महत्येच्या घटना घडल्या की पालकत्वाच्या चर्चेला पुन्हा उधाण येते. काही सकारात्मक दिशाही मिळते. महाराष्ट्राचे शैक्षणिक धोरण-निर्णय ठरताना किंवा ते जाहीर झाल्यावर किंवा दहावी, बारावीचे निकाल लावत असताना अशा बाबींवर आपल्याकडे रमेश पानसे, रेणू दांडेकर, अरुण ठाकूर, रमेश इंगळे, प्राचार्य शिवाजीराव भोसले, जयदेव डोळे यांनी पुष्कळ सकस चिंतन केले आहे. आनंददायी शिक्षणासारखा विषय बऱ्याच संस्थांमध्ये अंग चोरून बसला आहे. 'मुके बिचारे कुणी हाका' यासारखी विद्यार्थिवर्गाची अवस्था प्रा. यशवंत पाटील यांच्यासारख्या संवेदनशील शिक्षकाला अस्वस्थ करते. वर्षानुवर्षे आपण अध्यापन क्षेत्रात काढली, पण बराच मोठा पल्ला राहून गेला अशी बेचैनी अशा 'मास्तरांना' वाटत राहते. अशा बेचैनीतून प्रा. पाटील यांनी हे पुस्तक लिहिले आहे. पाने 96

View full details