Paishyachee Takad Olakha! By Vinod N. Bhat | Translator: Harshvardhan Kulkarni ( पैश्याची ताकद ओळख )
Paishyachee Takad Olakha! By Vinod N. Bhat | Translator: Harshvardhan Kulkarni ( पैश्याची ताकद ओळख )
‘दूरदर्शी आर्थिक नियोजनाद्वारे निश्चित आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचे उत्कृष्ट मार्गदर्शन`
गौतम बैद
Time is Money हे नक्कीच खरं आहे पण Money is Time हेही तितकंच खरं आहे.
योग्य आर्थिक नियोजनाद्वारे पैशांचा चांगला विनियोग करू शकलो तर जीवनातला
आनंद द्विगुणित करणाऱ्या गोष्टींवर आपण अधिकाधिक वेळ खर्च करू शकतो.
वेळ ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला पुन्हा मिळत नाही. पण आपल्या हाती
असणारा पैसा आपल्याला वेळेचे स्वातंत्र्य नक्कीच देऊ शकतो. म्हणूनच
आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे म्हणजे वेळ नावाचे दुर्मिळ गुप्तधन मिळवण्यासारखे
आहे. या वेळरूपी गुप्तधनाच्या जोरावर तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे जगण्याची
दुर्मिळ क्षमता प्राप्त करू शकता.
त्यासाठी आर्थिक स्वातंत्र्यालाच ध्येय समजून त्यामागे न लागता या प्रवासाचा
आनंद घेणे हा मुख्य हेतू हवा. चांगल्या आर्थिक सल्लागारामार्फत धोक्यांची
जाणीव करून घेतल्यास हा प्रवास अधिक आनंददायी होऊ शकेल.
Paishyachee Takad Olakha! | Vinod N. Bhat
Translated by : Harshvardhan Kulkarni
पैशाची ताकद ओळखा! । विनोद एन. भट
अनुवाद : हर्षवर्धन कुलकर्णी