Operation Bhagirathi By Mukund Dharashivkar (ऑपरेशन भागीरथी)
Operation Bhagirathi By Mukund Dharashivkar (ऑपरेशन भागीरथी)
Couldn't load pickup availability
डॉक्टर सुनील गरेवाल या भौतिकशास्त्रातील संशोधकाने आपल्या हवेच्या दाबावरील शोधाच्या साहाय्याने एक आश्चर्य घडविले. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही आपण पंचमहाभूते कल्पितो. वायू-वायूच्या साहाय्याने भूगर्भातून प्रवास करून पाण्यावर त्याचा जो परिणाम त्याने आणि त्याच्या सहकार्यांरनी घडवून आणला तो विस्मयजनकच! आणि ज्या परिसरात हा सगळा चमत्कार घडतो त्या परिसरामुळे त्या सर्वच प्रकल्पाला एक गुप्ततेचे, कुतुहलाचे रहस्यमय असे वलय प्राप्त होते.
पानामागून पाने कथानक आपल्याला स्वत:च्या प्रवाहाबरोबर ओढत नेते. आपल्या मनात शिरते. पोखरून तेथे घर करते. मानवी मनाचे नमुने टिपत टिपत सुंदर प्रसंगचित्रे आपल्या डोळ्यासमोर उभी करते.
ऑपरेशन भागीरथी ही विज्ञान कादंबरी खरीच! पण त्याबरोबरच त्यात रहस्यमयता आहे, वाचनीयता आहे, चित्रदर्शी रेखाटन आहे. निसर्गाचे सुंदर असे पार्श्वचित्रण आहे. अनेक पात्रे असूनही चित्रणाला नेकमेपणा आहे. मुकुंद धाराशिवकरांची दीर्घकाळ लक्षात राहावी अशी ही कलाकृती आहे...
Share
