Skip to product information
1 of 1

Noteshansaha bhaktigeete bhaag -2 By Chandrakant Sane (नोटेशनसह भक्तिगीते भाग – २)

Noteshansaha bhaktigeete bhaag -2 By Chandrakant Sane (नोटेशनसह भक्तिगीते भाग – २)

Regular price Rs. 212.00
Regular price Rs. 235.00 Sale price Rs. 212.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version
Quantity

 

सुंदर ते ध्यान’ किंवा ‘ओंकार स्वरुपा’ यांसारखे भक्तिरसाने ओथंबलेले भगवंताच्या आळवणीचे सूर प्रभातसमयी वाऱ्यावर लहरत कानावर आले की सकाळ कशी मंगलमय होते.

आजच्या पॉप आणि जॅझच्या संगीताच्या जमान्यातही गेली ४०-४२ वर्षे अवीट, मधुर शब्दांच्या भक्तिगीतांनी आपलं मन व्यापलं आहे. ही भक्तिगीते आपल्या थकलेल्या मनाला शांतता व आनंद देतात.

चंद्रकांत साने यांचे हे असेच भक्तिरसात चिंब भिजवणारे, नवोदित गायक, वादक व कलाकारांसाठी राग, ताल, संगीतातील शैक्षणिक व तांत्रिक माहिती आणि मार्गदर्शन करणारे आनंददायी पुस्तक.

ही भावपूर्ण भक्तिगीते फक्त गायची नाहीत तर पेटी व कॅसिओवर वाजवायची आहेत. लेखकाने सखोल अभ्यास करून नोटेशनच्या चिन्हांचा परिचय करून दिला आहे. या पुस्तकात एकूण ३० गाण्यांचा परिचय राग, आरोह, अवरोह व मूळ गायक यासह दिला आहे.

भक्तिगीतांसाठी वैशिष्ट्यपूर्ण मार्गदर्शन, प्रत्येक गाण्यासाठी खास टीप, पेटी कशी वाजवायची याबद्दल उपयुक्त सूचना, सरावासाठी पलटे व अलंकार याची माहिती हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

परिपूर्ण असे हे पुस्तक अल्पावधीतच लोकप्रिय झाले असून त्याला

सुरूवातीपासून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

नवोदितांनो या पुस्तकातून अभ्यास करा, सराव करा, तुमचा कार्यक्रम लोकांना नक्कीच आवडेल.

View full details