Noteshansaha Abhang Bhag - 1 By Mrs. Toshavi Anandache - Bharekar (नोटेशनसह अभंग भाग - १)
Noteshansaha Abhang Bhag - 1 By Mrs. Toshavi Anandache - Bharekar (नोटेशनसह अभंग भाग - १)
Couldn't load pickup availability
नोटेशनसह अभंग भाग - १
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ।तेणे मुक्ती चारी साधियेल्या ।।
अशी अवस्था प्राप्त करून देणारे गोड आणि प्रासादिक अभंग हे आपल्या मराठी साहित्याचे एक लेणेच आहे. ही अभंगवाणी गळ्याने गाणे आणि वाद्यांवर वाजवणे यातले समाधान निराळेच आहे. त्यामुळेच रसिकांच्या
खास मागणीस्तव हे अभंगांचे नोटेशन आपल्यासमोर सादर करत आहोत. लेखिका स्वतः गायिका असून नोटेशनची जाणकार आहे. त्यामुळे या नोटेशनच्या सहाय्याने कोणाही वादकाला अभंगाच्या स्वरावलीचा आनंद घेता येणार आहे. सुरुवातीला संगीत वाद्यविषयक माहिती दिलेली आहे.
लेखिकेच्या यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या भक्तिगीते भाग – ३ या पुस्तकाला रसिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. आता नोटेशनसह अभंग भाग-१ या पुस्तकाचेही आपण असेच भरभरून स्वागत कराल याची खात्री आहे. या पुस्तकानंतर लवकरच नोटेशनसह अभंग भाग-२ हेही आपल्या भेटीस येणार आहे.
Share
