Skip to product information
1 of 1

Nokarnama By Vitthal Ray Bhat (नोकरनामा -विठल राय भट )

Nokarnama By Vitthal Ray Bhat (नोकरनामा -विठल राय भट )

Regular price Rs. 90.00
Regular price Rs. 90.00 Sale price Rs. 90.00
Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version
Quantity

हे आत्मचरित्र नव्हे. एस्.एस्.सी. परीक्षा पास झालेल्या दिवसापासून (सोळाव्या वर्षी) ते थेट निवृत्त होईपर्यंतच्या (वय ५८) दिवसांपर्यंत विविध नोकऱ्यांत आलेले अनुभव या पुस्तकात नोंदविले आहेत. नोकरी करताना भेटलेली, लक्षात राहण्यासारखी माणसे, काळजाला भिडलेले अनुभव व माझी सर्वसाधारण निरीक्षणे यात नोंदविली आहेत. माझे वैयक्तिक व कौटुंबिक जीवन तसेच, खारमध्ये राहत असताना केलेल्या सामाजिक-राजकीय इत्यादी कामांचा तपशील. 'जांबावली ते आंबिवली' या आगामी पुस्तकात येणार आहे. साधारणबावीस वर्षे खारला राहिल्यानंतर गेली चोवीत वर्षे मी कल्याणजळील आंबिवली येथे राहतो. इथे रहायला आल्यापासून मी लेखनकार्याला जोमदारपणे सुरुवात केली. अजूनपर्यंत (जून २००६) माझी २७ मराठी व ३ इंग्रजी पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. शिवाय इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीतून २५ पुस्तकांचा एक संच पण प्रकाशित झाला आहे. या सवांचा तपशील व साहित्य क्षेत्रातील कडू-गोड आठवणी 'इये ग्रंथाचिये नगरी' या पुस्तकात शब्दबद्ध केले जातील. हे पुस्तक लिहिताना लेखनिक म्हणून कु. कांचन कुलकर्णी, व कु. प्रियांका चव्हाण, कु. सोनाली जाधव यांची बहुमोल मदत झाली. तिघींचीही हस्ताक्षरे सुंदर व वळणदार. या पुस्तकाची मुद्रणप्रत कु. कांचन कुलकर्णी हिने तयार करून दिली. या लेखनिकांचा मी अत्यंत आभारी आहे. माझे मित्र, मुक्तंगण प्रकाशनाचे मालक श्री. राजू भानारकर यांनी प्रकाशनाची जबाबदारी स्वीकारली, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. पाने 104

View full details