Skip to product information
1 of 1

Nitimulyanchya Sanskarkatha By Suhas Bartakke (नीतिमूल्यांच्या संस्कारकथा)

Nitimulyanchya Sanskarkatha By Suhas Bartakke (नीतिमूल्यांच्या संस्कारकथा)

Regular price Rs. 127.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 127.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version

‘आजच्या पिढीवर सुसंस्कार केले जात नाहीत,’ अशी ओरड आज सातत्याने केली जाते; परंतु ‘संस्कार’ ही जरब दाखवून, मारूनमुटकून करायची गोष्ट आहे का?
त्याऐवजी मुलांना मधाळ भाषेतून संस्काराचे काहीसे कडू वाटणारे चाटण द्यायला हवे, खरं ना?
त्यासाठी माध्यम कोणते, तर सोप्या भाषेतल्या छान छान रंजक गोष्टींचे!
कोकण हे अनेक नव्या-जुन्या साहित्यिकांच्या बालसाहित्यात सतत डोकावत असतं. कोकणचं निसर्गसौंदर्य, तिथली शहाळ्यासारखी माणसं, धुवाधार पाऊस, लाल माती यांमुळे कथेत वेगळीच वातावरणनिर्मिती होते.
नेमका याचाच वापर करून प्रा. सुहास बारटक्के यांनी या बोधकथा लिहिल्यात. हा खजिना आहे तो कोकणातली माणसं, भुतंखेत, निसर्ग, प्राणी, पक्षी, जंगल, प्राचीन देवालयं व गडकिल्ल्यांसंबंधी गोष्टींचा.
संस्कारक्षम व अंधश्रद्धा दूर करणार्या या गोष्टी तुम्हाला नक्कीच आवडतील; त्याचबरोबर मुलांच्या मनावर नकळत सुयोग्य संस्कारही करतील. आवडल्यास लेखकाला नक्की कळवा.

View full details