NisargGan By S D Mahajan
NisargGan By S D Mahajan
Couldn't load pickup availability
ज्येष्ठ वनस्पती आणि पर्यावरण तज्ज्ञ प्रा. श्री. द. महाजन तथा बापूंची वनस्पती आणि पर्यावरण या विषयांवरील १० पेक्षा जास्त पुस्तके आपल्या सर्वांच्या चांगल्याच परिचयाची आहेत. तुमच्याकडून मिळालेल्या भरभरून आणि उत्स्फूर्त प्रतिसादामुळेच बापूंना पुढील पुस्तके लिहिण्याचा उत्साह आणि प्रेरणा मिळत असते. बापूंचं वनस्पतींवरील प्रेम व आदर त्यांच्या प्रत्येक लिखाणात दिसून येते. या विषयांवर पुस्तकांव्यतिरिक्त बापूंनी अनेक लेख लिहिले आहेत तसेच त्यांना कविताही स्फुरल्या आहेत. एखादा विषय समजावून सांगताना बापू त्या विषयाशी इतके समरस होतात की त्यांना कविता होते. Poetry is spontaneous outburst of powerfull feelings असं काहीतरी बापूंचं होतं. अशा विषयांवर कविता करताना शास्त्रीय माहितीतील अचुकता जपणे ही अवघड तारेवरची कसरत बापूंनी चांगली साधली आहे. काही शास्त्रीय शब्दांचे आणि संदर्भाचे सोप्या शब्दांत स्पष्टीकरणही दिले आहे. या काव्यसंग्रहाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सर्व कविता बापूंच्या हस्ताक्षरात छापल्या आहेत.