Netrutva Panchavishi By Dr. Somnath Vibhute (नेतृत्व पंचविशी)
Netrutva Panchavishi By Dr. Somnath Vibhute (नेतृत्व पंचविशी)
यशस्वी नेत्यांच्या विविध गुणवैशिष्ट्यांचा अभ्यास करताना नेत्याच्या मनाचा ठाव घेणे किंवा त्याबाबत विचार करणे अपरिहार्य ठरते. नेत्याच्या मनाची संरचना ही अत्यंत महत्त्वाची असते. प्राप्त परिस्थितीकडे नेता कोणत्या दृष्टीने पाहतो हे त्याच्या मनाच्या संरचनेवर विसंबून असते. नेत्याच्या अंतरंगातील विचारतरंग त्याच्या निर्णयावर प्रभाव पाडतात. एखादी घटना ही आपत्ती, की संधी हे त्या नेत्याच्या मनोव्यापारावर अवलंबून असते. नेतृत्व नेहमी उत्साही असावे. नेत्याचे कार्यसातत्य हेही तितकेच महत्त्वाचे असते. याबरोबरच नेत्यावरील टीकेचे व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण कोणताही यशस्वी नेता असो, त्याचे टीकाकार कधीच कमी नसतात. 'निंदकाचे घर असावे शेजारी' ही उक्ती कायम लक्षात ठेवून आपल्यावरील टीकेने गोंधळून न जाता त्यास योग्य कार्याने उत्तर देणे साधता येते हे प्रस्तुत पुस्तक वाचताना आपल्या लक्षात येईल. - डॉ. मुरलीधर शिवराम कुन्हाडे