Nenchim By Narayan Dharap (नेनचिम्)
Nenchim By Narayan Dharap (नेनचिम्)
Couldn't load pickup availability
‘नेनचिम्’ एक शास्त्रकथा - ‘शास्त्रकथा’ या प्रकारात विविध ज्ञात, अज्ञात गोष्टींचा समावेश असतो. ते कल्पनांचे एक साहस आहे. पृथ्वीवरील जीवसृष्टीची निर्मिती, परिस्थिती, भविष्यात घडणाऱ्या किंवा घडू शकणाऱ्या घटनांची शक्यता, निसर्ग आणि मानव यांच्याशी संबंधित काल्पनिक, ज्ञात-अज्ञात गोष्टींचा समावेश शास्त्रकथेत असतो. यात लेखक स्वत:लाच असंख्य प्रश्न विचारतो व आपापल्या परीने त्यांची उत्तरेही देतो. त्यातूनच साहसी, थरारक, भय-गूढ, रहस्यमय अशा घटना मांडल्या जातात. ‘नेनचिम्’ ही अशीच एक शास्त्रकथा आहे. जेथे धूमकेतूंच्या द्रव्याचा, गतीचा, कक्षेचा, भ्रमण परिघाचा परिपूर्ण अभ्यास झाला होता. या आकाशस्थ दूरप्रवाशांच्या अभ्यासावरूनच अनेक रहस्यमय बाबी समजल्या होत्या. या घटनाप्रधान कथेत नेनचिमवर मानव वावर असल्याची अनुभूती वाचकांना होते. नेनचिमवर धूमकेतूंच्या द्रव्याचा, गतीचा, कक्षेचा भ्रमणपरिघाचा, परिपूर्ण अभ्यास झाला होता. या आकाशस्थ दूरप्रवाश्यांच्या अभ्यासावरून समजले होते की, त्यांच्या कक्षेचे एक टोक सूर्याच्या अगदी जवळ असते; आणि दुसरे टोक विशाल अवकाशात, दूरवर, सूर्यमंडळाच्याही बाहेर कोठेतरी असते. जणु काही इतक्या दूर, एकट्याएकट्याने, अंधारात येऊन पोहचल्यावर त्याला त्याच्या सूर्यपित्याची आठवण येते, स्वैरस्वातंत्र्याचा कंटाळा येतो, परत आपल्या ग्रहबंधूंना भेटण्याची इच्छा होते, आणि मग तो सावकाश, अति सावकाश गतीने परत फिरतो, एकेका ग्रहबंधूला भेटून, त्याची कक्षा छेदून परत आपल्या पित्याजवळ येतो. पण काहीतरी बिनसते. भेट होत नाही. जितक्या आवेगाने तो जवळ येतो तितक्याच वेगाने परत दूर जातो. दूरवरच्या अंधाराच्या कुशीत दडी मारतो. पुन्हा केव्हातरी, हजारो वर्षांनी, परत येण्यासाठी
Share
