Navya Yugacha Arambh By Sandeep Vasalekar, Vyankatesh Upadhye(Translators) (नव्या युगाचा आरंभ)
Navya Yugacha Arambh By Sandeep Vasalekar, Vyankatesh Upadhye(Translators) (नव्या युगाचा आरंभ)
Couldn't load pickup availability
आज जगात अनेक क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहेत. याचा शोध 'नव्या युगाचा आरंभ' या पुस्तकात घेतला आहे. संदीप वासलेकर हे जागतिक स्तरावर कार्य करणाऱ्या 'स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रूपचे अध्यक्ष आहेत. आज सर्वत्र होणाऱ्या बदलांचा शास्त्रशुद्ध वेध घेणे, त्या घटनांचे विश्लेषण करणे व त्यानुसार सरकारी धोरणे ठरविण्यासाठी जगातील देशांना 'स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रूप मदत करते.
संदीप वासलेकर आणि त्यांच्या ग्रूपच्या सहसंस्थापिका इल्मास फतेहअली हे 'नव्या युगाचा आरंभ' या पुस्तकात आजच्या जागतिक स्थितीत भारत कुठे आहे, हे सांगत आहेत. तसेच आगामी युग कसे असेल, याचीही मांडणी ते करतात.
येत्या दहा वर्षांत स्वित्झर्लंडच्या प्रयोगशाळेत कृत्रिम मेंदू अस्तित्वात येईल. पन्नासेक वर्षांत स्त्री-पुरुष संकरणाशिवाय महामानवाची निर्मिती होईल. शंभरेक वर्षांत महामानव व यंत्रमानव पृथ्वीबाहेर स्थायिक होतील. मानवानंतर कोणती संस्कृती उदयास येईल? या अनेक गोष्टी होत असताना भारत कोठे असेल?
भारतात भ्रष्टाचार, जातीवाद, चंगळवादानं कळस गाठलेला असेल. बाह्य प्रगतीसोबत भंपकपणा, चिल्लरपणा अन् उथळपणास मान्यता तर मिळणार नाही ना? आज जगात सर्व क्षेत्रात प्रचंड बदल होत असताना महासत्तेचं स्वप्न पाहणारा भारत कोठे असेल?
या सर्व धोक्यांची सूचना तसेच सावधगिरीचे उपायही ते प्रस्तुत पुस्तकात सांगत आहेत. आपणास काळाची गरज ओळखावी लागेल. या नव्या युगाशी जुळवून घ्यावं लागेल. असं केल्यास भारताची ती वाटचाल 'नव्या युगाचा आरंभ' असेल.
Share
