Nave Shaikshanik Dhoran By Prof. Dr. Nitin Karmalkar, Mangala Godbole
Nave Shaikshanik Dhoran By Prof. Dr. Nitin Karmalkar, Mangala Godbole
Couldn't load pickup availability
वयानुसार आता सक्रिय शिक्षणापासून, एकूण शिक्षणक्षेत्रापासून मी फार लांब गेलेली असले; तरी आपल्याकडल्या एकूण शिक्षणाबद्दल, शिक्षणव्यवहाराबद्दल मला नेहमीच कुतूहल आणि आस्था वाटत असते. त्याबद्दल मिळेल ते वाचणे, विचार करणे सुरू असते. अशाच वाचनात नवीन शिक्षणधोरणाबद्दल वारंवार येऊ लागले, तसे कुतूहल चाळवू लागले. नवीन शिक्षणधोरण आरपार समजून घेण्याची ही सुवर्णसंधी सोडणे मला शक्यच नव्हते. डॉ. करमळकर यांचे शिक्षणविषयक ज्ञान, अनुभव लोकांपर्यंत पोचवण्याचे काम मी आनंदाने स्वीकारले. त्यानंतर सुमारे सहा महिने त्यांच्या सवडीनुसार भेटणे, चर्चा, विचारविनिमय करून आता हे पुस्तक संपन्न होत आहे. त्याबाबतीत ज्ञानप्रबोधिनीचे मुख्याध्यापक श्री. मिलिंद नाईक व पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन विषयाच्या विभागप्रमुख डॉ. सुप्रिया पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन वेळोवेळी मिळाले, हे नमूद करणे आवश्यक आहे. केवळ या विषयाच्या प्रेमामुळे त्यांनी या पुस्तकासाठी स्वत:चा भरपूर वेळ दिला, म्हणूनच पुस्तक सर्वस्पर्शी झाले असे मला वाटते. डॉ. श्रीराम गीत यांनाही धन्यवाद.