Nasti Panchait By S. L. Khutwad (नस्ती पंचाईत)
Nasti Panchait By S. L. Khutwad (नस्ती पंचाईत)
Couldn't load pickup availability
कहाणी नवरा-बायकोची – मानली तर खरी अथवा कल्पनिक – कधी गोड कधी तिखट – `ती’ तापट; `तो’ सोज्वळ – सासू-आई-बाबा-सासरे सगळेच वल्ली - बायकोचा रुद्रावतार आणि गांगरलेला अथवा वैतागलेला नवरा – `तो’ सहनशीलतेचा पुतळा – ‘ती’ रणरागिणी (भांडणास सदैव तयार) – रोजची कटकट; तिची नुस्ती वटवट – त्याचा वेंधळेपणा; रोजचा मन:स्ताप – कधी सरप्राइज प्लॅन्स; तर कधी कडाक्याची भांडणं – आगीत तेल ओतणारे मित्र अथवा `कोण ती?’ हा संशय – आयुष्याची नाव डोलते आनंदात डावीकडे – कलंडते रागात उजवीकडे – धडकते नात्यांना – मग हिंदकळतात स्वप्नं - तरी जीवनातील साथ न सोडण्याचे वचन पाळतात नवरा-बायको कसे? कधी आपुलकी तर कधी वादाची खुमखुमी- इति नवरा - `तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू नकोस’ असं म्हणत बडबडणे – इति बायको - कधी-कधी कारण – विनाकारण स्वहस्ते करून घेतात नुकसान आणि एकमेकांना म्हणतात, `तुझ्यामुळेच झाली `नस्ती ‘पंचा’ईत..!’
Share
