Nashayatra By Tushar Natu (नशायात्रा)
Nashayatra By Tushar Natu (नशायात्रा)
Couldn't load pickup availability
ही गोष्ट आहे एका अधोगतीची. ब्राऊन शुगरसारख्या जालीम व्यसनांच्या आहारी जाऊन रस्त्यावर आलेल्या एका तरुणाची. मध्यमवर्गीय संस्कारातला तरुण व्यसनांमुळे घरदार- नातीगोतीच नव्हे, तर आपलं माणूसपणही कसं हरवून बसतो याची.
माणूस व्यसनांच्या जाळ्यात अडकतो तेव्हा त्याचं काय होतं? व्यसनांचा एकेक टप्पा ओलांडत तो त्यात गुरफटत जातो. ही व्यसनं त्याच्या शरीरावरच नव्हे, तर मनोबलावरही परिणाम करतात. आई-वडील अन् जिवलगांचं प्रेमही त्याला मदतीचा हात देऊ शकत नाही आणि आपलं चुकतंय हे कळत असूनही तो व्यसनांच्या फेर्यातून बाहेर पडू शकत नाही. बाहेर पडला तरी पुन्हा पुन्हा त्याच दुष्टचक्रात अडकत राहतो. हे सगळं एखाद्या माणसाच्या आयुष्यात घडतं, तेव्हा त्याच्या आयुष्याची पुरती ससेहोलपट होते.
..पण मनात जिद्द असेल तर ही नशायात्रा रोखून तो पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करू शकतो. अशाच एका माणसाची प्रांजळ आत्मकथा.
Share
