My India By Jim Corbett (माय इंडिया)
My India By Jim Corbett (माय इंडिया)
Couldn't load pickup availability
सुलताना स्वतंत्र होता, तेव्हा त्याच्या नुसत्या नावानेही चळाचळा कापणार्या लोकांनी त्याला खिल्ली उडवण्याच्या पातळीवर नेऊन ठेवायला नको होतं, त्याच्या हातापायात बेड्याही घालायला नको होत्या, असं मला वाटतं. त्याला थोडी सौम्य शिक्षा द्यायला हवी होती, असंही मला वाटतं. त्याला सामान्य आयुष्य जगण्याची संधीही नाकारली गेली होती.
एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, त्याच्या हातात सत्ता होती, तेव्हा त्याने कधीही गरिबांना त्रास दिला नव्हता. मी वडाच्या झाडापर्यंत त्याचा पाठलाग केलेला असतानाही त्याने मला आणि माझ्या मित्रांना जीवदान दिलं होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तो फ्रेडीला भेटायला आला, तेव्हा त्याच्या हातात सुरा किंवा बंदूक नव्हती, तर कलिंगड होतं!
आपला तर्क, नर्मविनोद शाबूत ठेवून साध्या माणसांमधल्या भावनिकतेला कमी न लेखण्याची, उलट त्यात पातळ होत जाण्याची जिम कॉर्बेटची शक्ती वेध लावणारी आहे! आपण आजच्या जगातले लोक तर्क न लावता येणार्याकडे फार तुच्छतेने पाहतो... माणसाला मोजायची मापं फार बोकाळली! म्हणूनच कदाचित जिम कॉर्बेट आजही वाचला जातो... वाचला जात राहील..
Share
