Murder Mystery By Deepa Deshmukh (मर्डर मिस्ट्री)
Murder Mystery By Deepa Deshmukh (मर्डर मिस्ट्री)
Couldn't load pickup availability
मानवी मनाच्या अज्ञात आणि अंधाऱ्या कोपऱ्यात काय दडलेलं असू शकतं?
या प्रश्नाने अस्वस्थ होणाऱ्या प्रत्येकासाठी, दीपा देशमुख लिखित ‘मर्डर मिस्ट्री’
हे सत्य घटनांवर आधारित पुस्तक हादरवून टाकणाऱ्या हत्याकांडांच्या जगात
घेऊन जातं; जिथे सत्य कल्पनेपेक्षाही विचित्र आणि भयावह आहे.
संपत्तीचा हव्यास, सूडभावना, विश्वासघात, मालकी हक्क, राजकारण आणि
मनातील विकृत इच्छा-आकांक्षा यांसारख्या अनेक कारणांमुळे घडलेले गुन्हे
म्हणजे मानवी स्वभावाचं क्रूर दर्शनच होय. या पुस्तकातलं प्रत्येक पान वाचकाला
एका थरारक तपासाचा साक्षीदार बनवेल. यात थंड डोक्याने आखलेले कट आहेत,
तर कधी संतापाच्या भरात उचललेलं विध्वंसक पाऊल आहे, कधी परिस्थितीचा सूड
घेण्यासाठी केलेलं अघोरी कृत्य आहे, तर कधी मानसिक गुंतागुंतीतून घडलेलं
क्रौर्यदेखील आहे. ‘मर्डर मिस्ट्री’ या पुस्तकात केवळ देशविदेशातल्या गुन्ह्यांची
नोंदच नाही, तर मानसशास्त्रीय विश्लेषण आणि न्यायासाठी दिलेल्या लढ्याचा
एक अस्वस्थ करणारा प्रवास आहे.
‘मर्डर मिस्ट्री’ वाचत असताना तुमच्या मनात एकच प्रश्न निर्माण होईल -
असं खरंच घडू शकतं? मनोविकास प्रकाशित, दीपा देशमुख लिखित
‘मर्डर मिस्ट्री’ वाचायलाच हवं!
Share
