Mumbai Ilakhyatil Jati By Govind Kalelkar
Mumbai Ilakhyatil Jati By Govind Kalelkar
Couldn't load pickup availability
'इंग्रजांच्या राजवटीत, तत्कालीन सरकारने 'गॅझेटियर' सारखे अनेक चांगले उपक्रम हाती घेतले होते. त्यातील एक उपक्रम 'जाती- जमातींची माहिती गोळा करण्याचा' होता. हे काम एन्थोवेन या इंग्रज अधिकाऱ्याने केले व सरकारने ते इंग्रजीत प्रसिद्ध केले. या इंग्रजी पुस्तकाचे नाव 'ट्राईब्ज अँड कास्ट्स ऑफ बॉम्बे ' असे होते. या पुस्तकाचा मराठी अनुवाद १९२८ मध्ये बडोदाहून 'श्री सयाजी ग्रंथमाला - क्रमांक २८' नुसार 'मुंबई इलाख्यातील जाती' या नावाने प्रसिद्ध केले. हे भाषांतर व लेखन 'गोविंद मंगेश कालेलकर' यांनी केले होते. या पुस्तकात एकंदर ४८३ जातींची माहिती दिली आहे. त्या काळच्या मुंबई प्रांतात गुजराती व कानडी मुलुखही असल्याने कानडी - गुजराती जातींचाही समावेश यात आहे. जातींची माहिती थोडक्यात दिली असली तरी, त्यात जमातींचे लग्नविधी, चालीरीती यांविषयी महत्त्वाची माहिती थोडक्यात दिली आहे. लग्नविधी बरोबरच अंत्यविधीचीही माहिती आहे.जुन्या काळी, जाती- जमातींची तपशीलवार माहिती गोळा करून दिल्यामुळे समाजशास्त्रच्या अभ्यासकांची मोठीच सोय झाली आहे. इतिहासकाळात रोटी- बेटी व्यवहार जातीबाहेर कधीही होत नसत त्यामुळे भारतीय समाज कप्पेबंद झाला होता. स्वांतत्र्यलढ्याच्या काळात, समाजसुधारकांच्या प्रयत्नामुळे भारतीय समाजात अभिसरण सुरु झाले ; आणि सर्व भारतीय समाज एकसंघ व संघटीत होणार अशी चिन्हे दिसू लागली. १९५० मध्ये भारत प्रजासत्ताक राष्ट्र झाले व प्रौढ व्यक्तिच्या सार्वत्रिक मतदानावर आधारलेली निवडणूकप्रधान लोकशाही भारतात अस्तित्वात आली. निवडणुकांचा एक परिणाम असा झाला कि, 'जाती- जमातींचे महत्व कमी होण्याऐवजी जास्तच वाढले' राजकीय पुढाऱ्यांनाही जातीजमातींचा अभ्यास महत्वाचा वाटू लागला. भारतीय समाज जातीत विभागला गेला आहे; व या जातींचे अस्तित्व शेकडो नव्हे यापेक्षाही, जातींचा सखोल अभ्यास होईलच आणि सुरुवातीचा एक प्रयत्न
म्हणून या पुस्तकाचे महत्व अबाधित राहणारच आहे.
Share
