Mulanchya A to Z Vyaktimatva Vikasasathi By G. D. Pahinkar (मुलांच्या A to Z व्यक्तिमत्त्व विकासासाठी)
Mulanchya A to Z Vyaktimatva Vikasasathi By G. D. Pahinkar (मुलांच्या A to Z व्यक्तिमत्त्व विकासासाठी)
Couldn't load pickup availability
पालक मित्रांनो, आपल्या पाल्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यशस्वी जीवन जगण्याचं कौशल्य त्यांनी आत्मसात करावं, यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील असतो; पण प्रयत्नांची नेमकी दिशा आपणास गवसत नाही. सततचा संघर्ष, जीवघेणी स्पर्धा, नीतिमूल्यांची पडझड आणि वाढता मानसिक ताण यामुळे तर ही दिशा अधिकच धूसर झालेली आहे.
आपल्या पाल्यांना सर्वांगीण विकासाची नेमकी दिशा दाखवून, उज्ज्वल भवितव्याकडे वाटचाल करण्याचे तंत्र आणि मंत्र, गो. द. पहिनकर यांनी 'मुलांच्या a to Z व विकासासाठी' या त्यांच्या पुस्तकात सांगितलेले आहेत. सदतीस वर्षांपासून शिक्षण क्षेत्रांत जाणीवपूर्वक कार्यरत असलेल्या, मुलांना, शिक्षण प्रक्रियेच्या केंद्रस्थानी मानून, निर्भेळ समर्पणवृत्तीने कार्य करणाऱ्या आणि राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षकाचे हे एक चिंतन आहे.
प्रभावी भाषा, सुलभ विवेचन, अनुकरणीय कृती कार्यक्रम, मनाचा ठाव घेणारी उदाहरणं, यामुळे हे पुस्तक वाचनीय झालेले आहे. सूर्याच्या कोवळ्या किरणांच्या स्पर्शानं कळ्यांची फुलं व्हावीत एवढ्या सहजतेने हे लेखन घडलेले आहे. मुलांच्या यशस्वी जीवनाचा विश्वासाई वाटाड्या म्हणून सतत संग्रही ठेवावं असं हे पुस्तक आहे.
Share
