Mulana Ghadavtana By Dr. Vijaya Phadanis (मुलांना घडवताना)
Mulana Ghadavtana By Dr. Vijaya Phadanis (मुलांना घडवताना)
Couldn't load pickup availability
मुलांना जन्म दिला म्हणजे तुम्ही
पालक झालात का? तर नाही. उलट त्या क्षणापासून पालकत्वाचा प्रवास सुरू होतो. आजच्या काळात ‘मुलांना वाढवणं’
हे आव्हानात्मक आणि अत्यंत कठीण असं एक प्रकारचं ‘काम’ आहे असा चिंतेचा सूर आजच्या तरुण पालकांमध्ये असलेला दिसतो. पण खरं तर, पालकत्वाशी निगडित काही मूलभूत गोष्टी समजून घेतल्या तर हा अनुभव खूपच आनंददायी ठरू शकतो.
पालक म्हणून मुलांना वाढवताना होणार्या चुका ओळखून, त्या वेळीच कशा दुरुस्त कराव्यात याचं उत्कृष्ट मार्गदर्शन डॉ. विजया फडणीस या पुस्तकात करतात. याशिवाय काही कळीचे मुद्देही त्या विचारात घेतात :
* मुलांचं भावविश्व कसं जपावं?
* मुलांमध्ये आत्मविश्वास, महत्त्वाकांक्षा आणि आत्मप्रतिमा कशी निर्माण करावी?
* मुलांचा अभ्यास व वर्तनासंदर्भातील समस्या कशा हाताळाव्यात?
* ‘३ Idiots ’ अर्थात टी.व्ही., मोबाईल आणि इंटरनेट या तीन ‘अविभाज्य घटकांशी’ कसा सामना करावा?
मानसोपचारतज्ज्ञ म्हणून काम करत असताना आलेल्या अनुभवातून आणि अभ्यासातून डॉ. फडणीस यांनी केलेलं मार्गदर्शन सर्व सुज्ञ पालकांना आपल्या मुलांना घडवताना नक्कीच उपयोगी पडेल.
Share
