Mukya Kalya - मुक्या कळ्या | By V. S. Khandekar
Mukya Kalya - मुक्या कळ्या | By V. S. Khandekar
Couldn't load pickup availability
दत्त रघुनाथ कवठेकरांच्या निवडक कथांचा श्री. वि. स. खांडेकर यांनी संपादित केलेला हा संग्रह. मध्यमवर्गाची विविध कौटुंबिक चित्रे रेखाटताना भावव्याकूळ होणारे, या वर्गाच्या स्त्रीजीवनातल्या मूक दु:खाच्या छटा रंगवताना करुणरसाचा उत्कर्ष साधणारे आणि कारुण्याच्या कृष्णमेघाला अधूनमधून उदात्ततेची रुपेरी कडा दाखवून, वाचकाला निराळ्याच सात्त्विक जगाचे दर्शन घडविणारे कवठेकर हे मराठी साहित्यातील आरंभीचे कथाकार. त्यांच्या चार कथासंग्रहांतील या सात निवडक कथा. कवठेकरांच्या कथेचे बळ तिच्या कलादृष्टीत अथवा तंत्रसौंदर्यात नाही; ते तिच्या आत्म्यातून पाझरणाया रसात आहे. त्यांच्या कथांना उपमा द्यायचीच झाली, तर श्रावणातल्या पावसाची देता येईल. ढगांचा गडगडाट नाही, विजांचा चमचमाट नाही, वादळवारा नाही, मुसळधारा नाहीत काही नाही. असे असूनही उन्हाशी पाठशिवणीचा खेळ खेळणारा श्रावणातला तो पाऊस काय कमी आकर्षक असतो?