Mrugajalatil Kalya - मृगजळातील कळ्या | By V. S. Khandekar
Mrugajalatil Kalya - मृगजळातील कळ्या | By V. S. Khandekar
Couldn't load pickup availability
वि. स. खांडेकरांनी लिहिलेल्या अठ्ठावीस रूपककथांचा संग्रह. इसापासून जिब्रानपर्यंत भिन्न भिन्न काळांतल्या आणि निरनिराळ्या पेशांतल्या प्रतिभावंतांनी कथेचा हा चिमुकला, पण चटकदार प्रकार लोकप्रिय केला आहे. रूपककथा ही अनेकदा अन्योक्तीसारखी असते किंवा भासते. `रूपककथा` हे या वांड.मयप्रकारचे शीर्षकही खांडेकरांनी अत्यंत विचारपूर्वक `घडवले` आहे. या प्रकारच्या कथेचे विषय काळाबरोबर बदलत गेले, तरी तिचा टीकात्मक दृष्टीकोन अधिक अधिक व्यापक, सामाजिक व सर्वस्पर्शी होत राहिला. क्वचित तिला काव्यमय स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला, तरी तिची आत्मशक्ती होती तशीच राहिली. तिच्यात काहीही बदल झाला नाही. या रूपककथांचे खरे सामर्थ्य सूचकतेने, पण अचूक रीतीने केलेल्या सत्यदर्शनात आहे. जग अष्टौप्रहर तोंडावर मुखवटे घालून आपले व्यवहार पार पाडीत असते. व्यक्ती आणि समाज यांची बाह्यरूपे स्वार्थलंपटटेमुळे बहुधा फसवी ठरतात. या सर्वांचे सत्यस्वरूप कळावे, म्हणून त्यांच्या तोंडांवरचे मुखवटे दूर करण्याचा रूपककथा कसोशीने आणि कौशल्याने प्रयत्न करीत असते, हाच प्रत्यय हा संग्रह वाचून वाचकांना येईल.