Monsoon Jan Gan Man By Sunil Tambe (मान्सून जनगणमन)
Monsoon Jan Gan Man By Sunil Tambe (मान्सून जनगणमन)
Couldn't load pickup availability
Available After Publishing - 10 October 2025
मान्सूस म्हणजे केवळ मौसम किंवा पर्जन्याचा प्रवास नव्हे. भूगोल आणि हवामानशास्त्राच्या
पलिकडे त्याला वैश्विक सांस्कृतीचे विलक्षण वेधक परिमाण आहे. आपल्या सामाजिक नव्हे,
तर कृषी आर्थशास्त्राबरोबर रजकीय संदर्भही त्याला आहेत. हजारो वर्षे विविध ओळखी
असलेल्या जनसमूहांचे संमीलन, संघर्ष आणि स्पर्धेतून साकारलेलं सहजीवन हा या मान्सूनचा
परिणाम आहे. दक्षिण आशिया म्हणजे पाकिस्तान, भारत, नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका
हे सर्व देश मिळून एक राष्ट्र बनतं असं मान्सून सांगतो.
युरोप-अमेरिका ते चीन-जपान या देशांना दक्षिण आशियाचं आकर्षण वाटण्यामागेही हाच
मान्सून कारणीभूत आहे. तो केरळमधून विस्तारत सर्वत्र पसरला नसता, तर वास्को-द-
गामाला केरळमधल्या मसाल्याची चव कळली असती का? योरोपला मसाल्याची, अन्नाची,
जीभेची चव समजली नसती, तर विस्तारवाद, वसाहतवाद आणि साम्राज्यवाद हे त्याचे
आविष्कार झालेच नसते. म्हणजेच जगाची नवी मांडणी झालीच नसती. ती मान्सूनमुळे घडली.
अशा या इतिहासाचे आणि भौगोलिकाचे भान जपत सुनील तांबे यांनी सिद्ध केलेला हा ग्रंथ
अभ्यासपूर्ण आणि वाचनीय झालेला आहे. या ग्रंथातून केवळ मान्सूनचेच नव्हे, तर
‘सिव्हिलायझेशन मार्च’ कसा होत होता याचे दर्शन घडते. तांबे यांच्या चित्तवेधक आणि
शैलीदार मांडणीमुळे हे पुस्तक वाचकाला एका वेगळ्याच मान्सूनची अनुभूती देईल.
Share
