Molkarin By Govind Narayan Datarshastri
Molkarin By Govind Narayan Datarshastri
Couldn't load pickup availability
मोलकरीण ही कादंबरी आग्रा शहरात घडते. मोगल बादशहापैकी शहाजहान बादशहाच्या काळातील घटना या कादंबरीत आहेत. शहाजहानच्या काळातील आग्रा शहराचे वर्णन यात आलेले आहे. अर्थात ताजमहालचा उल्लेख तर आहेच. कादंबरी मोलकरणीवर नसून कशिदाकाम करणाऱ्या शिंपिणीवर आहे. ही शिंपिण सुद्धा दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडलेल्या एका सरदार पत्नीचीच मुलगी असते. या कादंबरीत सरदार, त्यांचे वाडे, वाड्यातील कारस्थाने, यांचा मुख्यतः भर आहे. तत्कालीन सरदारांचे आयुष्य कसे सुखासिन होते हे यात दर्शविले आहे. गो. ना. दातारांच्या पद्धतीनुसार राजवाड्यातील कुट-
कारस्थाने, भयकारक प्रसंग आणि सतत 'पुढेकाय होणार' यासाठी वाचकाची उत्सुकता जागृत ठेवणाऱ्या घटना यांची नुसती रेलचेल आहे. ही कादंबरी प्रसिद्ध साम्यवादी नेते' श्रीपाद अमृत डांगे' यांची फार आवडती होती व त्यांनी ती अनेकदा वाचली होती.
Share
