Mi Pakistanatil Bharatacha her by Mohanlal Bhaskar(मी पाकिस्तानातील भारताचा हेर)
Mi Pakistanatil Bharatacha her by Mohanlal Bhaskar(मी पाकिस्तानातील भारताचा हेर)
Couldn't load pickup availability
ही जोवनकहाणी ‘हेरगिरी’ या विषयावर विशेष प्रकाश टाकते. या पुस्तकात १९६५च्या भारत-पाक युद्धादरम्यान त्यांचा पाकिस्तानात झालेला प्रवेश, तिथे त्यांचं पकडलं जाणं आणि पर्यायाने त्यांनी भोगलेल्या दीर्घकालीन तुरुंगयातनांचं चित्रण त्यांनी केलं आहे. परंतु ही साहित्यकृती केवळ साहस व दुर्दम्य निग्रह यांचं वर्णन करत नसून ती पाकिस्तानच्या तत्कालीन परिस्थितीचंही विश्लेषण करते.
पुस्तकात मोहनलाल पाकिस्तानातलं भुट्टोप्रणित तथाकथित लोकशाही सरकार, निरंतर मजबूत होत जाणारे हुकूमशहा यावर भाष्य करतात, तसेच धार्मिक कट्टरतावाद आणि त्याला विसंगत असणारे सामाजिक-आर्थिक पैलू उलगडून दाखवतात. भारतविरोधी षड्यंत्र रचणाऱ्या पाकिस्तानातल्या विविध आंतरराष्ट्रीय सूत्रांबद्दलही ते इथे विवेचन करतात. मोहनलाल एकीकडे पाकिस्तानी तुरुंगांची नरकप्राय स्थिती, तुरुंग अधिकाऱ्यांचं अमानुष वर्तन यांचं वर्णन करतात तर, दुसरीकडे ते पाकिस्तानी जनता आणि मेजर सिपरा यांच्यासारख्या व्यक्तींची माणुसकीची वागणूक रेखांकित करायलाही विसरत नाहीत.
हेरगिरीचं अंतरंग दाखवणारं विश्वासार्ह पुस्तक…
Share
