Mee Jinklo! Mee Harlo! By Vijay Tendulkar (मी जिंकलो ! मी हरलो !)
Mee Jinklo! Mee Harlo! By Vijay Tendulkar (मी जिंकलो ! मी हरलो !)
Couldn't load pickup availability
मराठी नाटकं जेव्हा बाळबोध, गुळगुळीत रस्त्यांवरून गोल चकरा मारत होती तेव्हा त्यांना आधुनिक वळण देणारी नाटकं तेंडुलकरांचीच आहेत -मराठी नाटकांत नवा जोम या नाटकांनी ओतला!
माणूस, त्याचे शरीर, त्याचा अहंभाव, भोवतालचा गोतावळा व या गोतावळ्याशी असलेल्या सबंधांची निरर्थकता यातून येणारा एकाकीपणा, पापपुण्याच्या कल्पना, थोडक्यात म्हणजे माणसाचे व्यक्तिगत सत्त्व व त्याचे सामाजिक अस्तित्व या दोहोंतील संवादित्व-विसंवादित्व या विषयीचे चिंतन… हे तेंडुलकरांच्या नाटकाचे पायाभूत तत्त्व असते.
‘मी जिंकलो! मी हरलो!’ हे तेंडुलकरांचे सुरुवातीच्या काळातले नाटक. यात आप्तेष्टांतील बाह्यद्वंद्वापेक्षा माधवच्या मनातील आंतद्वंद्व अधिक लक्षणीय आहे. माधवचा आत्मशोध, त्यासाठी चाललेला त्याचा झगडा व तो संपल्यावर त्याला होणारा आनंद हे सर्व कळून घेतल्यावरच नाटकातील वैधशक्ती प्रत्ययास येते.
Share
