Me Yashaswi Honarach By Prabhakar Bhore (मी यशस्वी होणारच)
Me Yashaswi Honarach By Prabhakar Bhore (मी यशस्वी होणारच)
Couldn't load pickup availability
मी यशस्वी होणारच!' हे प्रभाकर भोरे लिखित पुस्तक त्यांच्या जीवनातील अनुभवांचीच जणू शिदोरी आहे. तसं पाहिलं तर हे पुस्तक सर्वांसाठीच आहे. ज्यांना जीवनात यश मिळवायचं आहे, मग ते परीक्षेला बसणारे असोत किंवा नसोत; त्या प्रत्येकाला हे पुस्तक नक्कीच उपयोगी पडेल.
नुसतं परीक्षेत सुयश कसं मिळवावं हे सांगणं हा या पुस्तकाचा उद्देश नाही, तर हे पुस्तक तुम्हाला नवीन ध्येय आखण्यास, स्वत:बद्दल आणि स्वत:च्या जीवनाबद्दल एक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यास मदत करील. जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते हे सांगण्याच्या उदात्त हेतूनं या पुस्तकाचं लिखाण केलं आहे.
प्रत्येक विद्यार्थ्यासाठी तसंच त्यांच्या पालकांसाठीही प्रस्तुत पुस्तक निश्चितच मार्गदर्शक ठरेल.
पुस्तकाची वैशिष्ट्ये:
‘मी यशस्वी होणारच!' हे पुस्तक वाचकांमध्ये दुर्दम्य आत्मविश्वास निर्माण केल्याशिवाय राहणार नाही.
या पुस्तकाच्या प्रत्येक प्रकरणातून वाचकास उत्साह, चैतन्य व नवीन दृष्टी मिळेल.
यशाचे शिखर अडचणींच्या डोंगरावर चढून कसे सर करता येईल हे लेखकाने सुंदर, सहज आणि सोदाहरण पटवून सांगितले आहे.
प्रस्तुत पुस्तकात आत्मपरीक्षण, कला, कल्पना व विचारशक्ती यांविषयीचे सखोल विवेचन दिले आहे.
स्वयंप्रेरणा, मानसिकता, आत्मविश्वास, एकाग्रता, वेळे महत्त्व, अंतर्मनाची शक्ती तसेच स्वयंप्रेरित अभ्यासाचे तंत्र या संदर्भातही हे पुस्तक बहुमोल मार्गदर्शन करते.
Share
