Me Hindu Jhalo ! By Ravin Thatte (मी हिंदू झालो !)
Me Hindu Jhalo ! By Ravin Thatte (मी हिंदू झालो !)
Couldn't load pickup availability
"माणूस जन्मतो त्या वेळेला त्याला कुठे धर्म असतो? हिंदी सिनेमात तर नेहमीच्या 'फॉर्म्युला' प्रमाणे जुळी मुले होतात; मग अनाथ होतात, पांगतात आणि निरनिराळ्या धर्मांत वाढतात. माणूस आईबापांचाच धर्म घेतो. माझे आई - वडील शीलवान होते, त्यांना सामाजीक बांधिलकी होती, त्यांनी आमच्यावर चांगले संस्कार करण्याचा मनःपूर्वक प्रयत्न केला. आयुष्यात जी मूल्ये त्यांना अभिप्रेत होती, ती 'तुम्हाला कोठून मिळाली' हा प्रश्न त्यांना विचार करण्याइतकी समज मला त्यावेळी नव्हती.
" आमच्या घरात देव नव्हते, पूजा तर नव्हतीच नव्हती. सणवार होते, पण दिवाळी असे फटाक्यांसाठी, संक्रात तिळगुळासाठी आणि शिवरात्र रताळ्याच्या किसासाठी!
"धर्माची जागा आमच्या कुटुंबात काही विशिष्ट मूल्यांनी आणि देशप्रेमाने घेतली होती. आमच्या घरात गांधी, टिळक भरून वाहात होते. सावरकर, गोळवलकर नव्हते. सुभाषबाबू थोडे होते. डांग्यांचा उल्लेख असे. एस. एम. जोशी तर घरचेच होते. पण खरे वास्तव्य टिळक आणि गांधीचे होते. विपर्यास असा होता की, हे दोघे त्यांचे विचार धर्माच्या कोष्टकातून सांगत होते. मात्र आमच्या घरात धर्माची चर्चा अभावानेच झाली.
Share
