Mazi Shipaigiri By S P P Thorat, (माझी शिपाईगिरी)
Mazi Shipaigiri By S P P Thorat, (माझी शिपाईगिरी)
Couldn't load pickup availability
" गेल्या शतकात कोल्हापूर संस्थानातील शेतकरी कुटुंबातील एक मुलगा हिंदी लष्करातील सर्वोच्च अधिकारपदावर जातो, ही काही आपोआप सहजगत्या घडून आलेली घटना नसून तिला एक ऐतिहासिक व सामाजिक कारणपरंपरा होती आणि त्या परंपरेचा उद्गम बिंदू होता कोल्हापूरचा लोकराजा रावर्षी शाहू छत्रपती. त्यांच्या राजाश्रयाने वडगावच्या चिमणाजी पाटलांचा मुलगा, पांडुरंग, हा उच्चविद्याविभूषित झाला आणि भारतातील थोर कृषितज्ज्ञ म्हणून रावब. डॉ.पी.सी.पाटील या नावाने प्रसिद्धी पावला! या रावबहादुरांचे चिरंजीव शंकरराव म्हणजे प्रस्तुत चरित्र नायक ले.ज.एस.पी.पी.थोरात. हे सर्व इथं आठवले एवढ्यासाठी की सन १८९९ मध्ये शाहू छत्रपतींनी पांडुरंग पाटील नावाचा मुलगा मॅट्रिक पास झाल्याचे कळाल्यानंतर त्याच्या गावी खास घोडेस्वार पाठवून त्याला बोलावून घेतले नसते व पुढील शिक्षणासाठी प्रवृत्त केले नसते तर 'रावबहादूर डॉ.पी.सी. पाटील'च नव्हे तर जनरल एस.पी.पी. थोरातही देशाला मिळाले नसते. अशा ऐतिहासिक व सामाजिक घटनांची कारणपरंपरा इतिहास आपणास सांगत असतो. इतिहासाची खरी फलश्रुती हीच आहे."
Share
