Skip to product information
1 of 1

Mayabajar By V.P.Kale (मायाबाजार)

Mayabajar By V.P.Kale (मायाबाजार)

Regular price Rs. 127.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 127.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

मायाबाजार-वपुंच्या कथाविश्वात मध्यमवर्गीय जीवन केंद्रवर्ती असले, तरीही मध्यमवर्गीय जीवनाच्या ठरावीक चाकोरीच्या या कथा नाहीत. सामान्य माणसाच्या सामान्य जीवनातल्या `असामान्य` सुखदु:खांना उद्गार देणा-या या कथा आहेत. हलक्याफुलक्या, मिस्किल, विनोदी शैलीचे अधिष्ठान `वपुं`च्या कथांना असले, तरीही त्यांच्या कथा कधी `आचरट` होत नाहीत. त्यांच्या कथानिवेदनात एकप्रकारचा संयतपणा आहे. वाचकांना खुलवणाया, हसवणाया रंजकतेचे अधिष्ठान आहे. हव्यास म्हणून त्यांच्या कथा `स्वस्त रंजकते`ला थारा देत नाहीत. लेखक बहुश्रुत असल्यामुळे या कथाविश्वात विविधता व विपुलता आहे. त्यात अनुभवाचा तोचतोचपणा नाही. त्यांच्या कथा या ना त्या प्रकारे सामान्यातल्या सामान्य वाचकांच्या मनोविश्वाला स्पर्श करून जातात. त्या स्पर्शाने वाचक अंतर्मुख व्हावा असे सामथ्र्य `वपुं`च्या कथेत आहे.वपुंच्या कथाविश्वात मध्यमवर्गीय जीवन केंद्रवर्ती असले, तरीही मध्यमवर्गीय जीवनाच्या ठरावीक चाकोरीच्या या कथा नाहीत. सामान्य माणसाच्या सामान्य जीवनातल्या `असामान्य` सुखदु:खांना उद्गार देणा-या या कथा आहेत

View full details