Matrutva By Shobhana Karanth
Matrutva By Shobhana Karanth
Couldn't load pickup availability
सर्रकन् एक पावसाची सर आली. छोट्या-छोट्या काटक्या गोळा करून खिडकीच्या तावदानावर बांधलेले एक चिमणीचे घरटे, त्यातून लाल-लाल चोचीतून ऐकू येणारा हलकासा चिव चिव आवाज म्हणजे पोटातील भुकेची ती आर्तता होती. घरट्यातून अधुन-मधून इवल्याशा डोळ्याने टुकूर टुकूर बाहेर बघणारी ती शोधक नजर आपल्या आईला शोधत होती. घरट्याच्या बाजूलाच एक कावळा काव काव करून त्या नाजूक पिलांकडे आधाशीपणे बघत होता. त्या कोवळया पिलांची शिकार कधी हाती येईल...? कावळा काव काव करत हळूहळू इकडे-तिकडे बघत पुढे सरकत होता आणि ती छोटी पिलं घाबरून नाजूक आवाजात चिव चिव करून आपल्या आईला साद घालत होती. कावळा घरट्याजवळ येऊन आपल्या चोचीत पिलांना उचलणार तेवढ्यात त्या पिलांच्या आईने (चिमणीताई) आपल्या चोचीत डाळीचे तीन चार दाणे टिपून आपल्या पिलांजवळ येऊन पिलांच्या चोचीत भरवून आपल्या पंखाखाली घेतले. कावळा मात्र बघत राहिला आणि काव काव करत उडून गेला. ती पंख न फुटलेली पिलं पुन्हा आईच्या पंखाखालून चिव चिव करत बाहेर डोकावू लागली. त्यांच्या चोचीत चोच घालून ती चिऊताई आपल्या पिलांशी हितगुज करू लागली. आनंदाने आईच्या कुशीत शिरून निर्धास्तपणे खेळू लागली....
Share
