Skip to product information
1 of 1

Mati Pankh Ani Akash By Dnyaneshwar Mule (माती, पंख आणि आकाश)

Mati Pankh Ani Akash By Dnyaneshwar Mule (माती, पंख आणि आकाश)

Regular price Rs. 196.00
Regular price Rs. 230.00 Sale price Rs. 196.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातलं
लाट नावाचं गाव! या गावातल्या सामान्य कुटुंबातला एक मुलगा
आपल्या गावच्या मातीला साक्षी ठेवून चालू लागतो. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, जनाबाई, मुक्ताबाई या संतांचे विचारधन आणि
मूलभूत सामाजिक परिवर्तन घडवणारे फुले, आगरकर, शाहू महाराज, आंबेडकर आदींची दृष्टी त्याचे सगेसोबती बनतात.
आकाशाला गवसणी घालण्यासाठी चिकाटी आणि परिश्रम
यांचे पंख घेऊन झेप घेणारा हा ध्येयवेडा कवीमनाचा तरुण
स्वसामर्थ्यावर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत
घवघवीत यश मिळवतो आणि संवेदनशील मन आणि
सूक्ष्म निरीक्षणदृष्टी ठेवून देशसेवेत रममाण होतो.
जगभर देशाचं प्रतिनिधित्व समर्थपणे करणारा हा
उच्चपदावरचा अधिकारी मानवतेचं, पर्यावरणाचं आणि
सामाजिकतेचं भान सोडत नाही. ‘विश्वची माझे घर’
हे त्याच्या जगण्यात प्रतिबिंबित झालेलं दिसतं.
नवनवी आव्हानं स्वीकारत वेगळी माणसं, प्रदेश, निसर्ग आणि ज्ञान यांच्याकडे हा माणूस खेचला जातो. ‘जीवनातला एकमेव आनंद म्हणजे आपला रस्ता आपण ओळखणं आणि त्या रस्त्यावरून मनाची,
बुद्धीची आणि विचारांची मशागत करत प्रत्येक संघर्षाला
विधायक रूप देत पुढे पुढे जाणं’ असं म्हणणार्या या जिप्सीचा,
म्हणजेच भारतीय विदेश सेवेत काम करणार्या ज्ञानेश्वर मुळे यांचा उत्कंठावर्धक प्रवास ‘माती, पंख आणि आकाश’ उलगडून दाखवतं.
कोणत्याही रूपात देशसेवेचं स्वप्न पाहणार्या प्रत्येकानं अवश्य वाचावं असं, ‘माती, पंख आणि आकाश’!

View full details