Mastaranchi Savli By Krishnabai Narayan Surve ( मास्तरांची सावली )
Mastaranchi Savli By Krishnabai Narayan Surve ( मास्तरांची सावली )
अनेक वर्षांपासून माझ्या मनात आठवणींचा फेर घुमत होता नुस्ता. मला त्याला वाचा द्यायची होती. पण संसाराच्या धबडग्यात ते राहूनच जात होतं. पण गेल्या दोनतीन वर्षांपासून मनाचा नुस्ता कोंडवाडा झाला होता. असं वाटत होतं की आपलं आयुष्य आता लौकर संपणार आहे. त्या आधी मनाची ही घुसमट सगळी काढून टाकायचीय. पण गेल्या काही दिवसांपासून मनात धाकधूकही होतेय, 'कृष्णाबाई, तू एक अडाणी बाई, तू जे काही सारं सांगते आहेस ते चांगलं झालं तर ठीक; पण नाही चांगलं झालं तर...? मग निदान ते चांगलं व्हावं अशी प्रार्थना तरी कर !' सगळ्यांच्या आयुष्यात सगळं चांगलंच घडतं असं नाही. काही अनुभव वाईटही असतात. कदाचित यातले काही चांगले वाईट अनुभव निसटूनही गेले असतील. पण जे आठवतंय ते तरी सांगितलंच पाहिजे. अर्थात आयुष्याचा सगळा पट कुठे सांगत बसायचा ? शक्यही होणार नाही ते. एवढं मात्र खरं की पावलापावलांवर आपल्याला अनुभव मिळत असतात. ते आपण झाकून का ठेवायचे ? सगळेच आठवणार नाहीत, पण जे आठवताहेत ते सांगून मन तरी हलकं होईल ना ! - कृष्णाबाई नारायण सुर्वे