Marco Polo : Europe Ani Asiala Jodnara Sahasi Pravasi By Sanjay Kaptan (मार्को पोलो)
Marco Polo : Europe Ani Asiala Jodnara Sahasi Pravasi By Sanjay Kaptan (मार्को पोलो)
Couldn't load pickup availability
व्यापार आणि प्रवास करताना त्याने अनेक संकटांना आणि खडतर आव्हानांना तोंड दिले. अनेक वाहनांचा, साधनांचा वापर करून त्याने रस्ते, वाळवंट आणि समुद्र यांतूनदेखील प्रवास पूर्ण केला. व्हेनिससारख्या युरोपीय नगरातून बीजिंग, नानकिंग, जावा, सुमात्रा, मलाया, व्हिएतनाम, सिलोन करत भारतालादेखील त्याने भेट दिली. हजारो मैलांचा प्रवास करताना हा साहसवीर एक आश्चर्यकारक जीवन जगला. त्याच्या या प्रवासाचीच ही कथा.
युरोप आणि आशिया या दोन्ही खंडांची एकमेकांशी ओळख करून देणाऱ्या मार्को पोलो या साहसी प्रवाशामुळे युरोपाला एका नव्या जगाचा परिचय झाला. विविध प्रदेशात फिरताना त्याने अनेक भाषा आत्मसात केल्या. मार्को पोलोच्या प्रवासातील अद् भुत घटना, रोमहर्षक प्रसंग, त्या काळातील लढाया, राज्यांची आणि राज्यकर्त्यांची वर्णने वाचण्यासाठी, त्या काळचा अनुभव घेण्यासाठी वाचायलाच हवं असं पुस्तक.
Share
