Marathi Bhasha : Dhoran Ani Ammalabajavani By Datta Gholap, Sangram Gaikwad (मराठी भाषा : धोरण आणि अंमलबजावणी )
Marathi Bhasha : Dhoran Ani Ammalabajavani By Datta Gholap, Sangram Gaikwad (मराठी भाषा : धोरण आणि अंमलबजावणी )
Couldn't load pickup availability
मराठी भाषेत सरकारने काय काय करावे, यासंदर्भामध्ये मोकळेपणाने चर्चा करायला पाहिजे. दुर्दैवाने गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात इंग्रजी शाळा वाढत आहेत आणि मराठी शाळा कमी होत आहेत. जगात कुठेही असे नाही. कोरिया, जपान, रोमानिया, हंगेरी यांसारखे नोबेल प्राइज मिळवणारे लहान लहान देश जर बघितले तर तिथल्या लोकांचे त्यांच्या मातृभाषेत शिक्षण झालेले असते. मराठी लोकांसारखे ते काही इंग्रजी शाळेमध्ये शिकत नाहीत. अशा परिस्थितीमुळे तुम्हाला किरकोळसुद्धा काही मिळवता येणार नाही; नोबेल प्राइज तर सोडाच, अशी आपली वाईट परिस्थिती आहे. म्हणून मराठीसह आपण जगण्याच्या अनेक पद्धतींचे संवर्धन करणे आणि त्या निमित्ताने जे काही विचार येतील त्यावर बोलायला लोकांना बोलावणे, अशा प्रकारचे वेगवेगळे प्रयोग करणे असे उपक्रम या नव्या संस्थेकडून होणार आहेत. वर्षाकाठी दोनतीन वेळा तरी अशा प्रकारचे कार्यक्रम घडवून आणणं, हे आपल्या मराठी भाषेसाठी एक लक्षण होऊन बसलं पाहिजे, अशी आशा मी यानिमित्ताने बाळगतो आणि अत्यांत तगर्नदाने सुरुवातीच्याच या घटनेत भाग घेतो
भालचंद्र नेमाडे
(चर्चासत्रासाठी पाठवलेल्या शुभेच्छा संदेशातून )
Share
