Manvatesarthi Ladhanara Mahatma By Ad. Shankar (मानवतेसाठी लढणारा महात्मा -शंकर)
Manvatesarthi Ladhanara Mahatma By Ad. Shankar (मानवतेसाठी लढणारा महात्मा -शंकर)
Couldn't load pickup availability
मानवतेसाठी लढणारा महात्मा - अॅड. शंकर
प्रियजन स.न.वि.वि.
आज 21 व्या शतकातही जगभरात भारताची ओळख आहे ती, बुद्ध-गांधींचा देश म्हणून. शांतता, अहिंसेच्या तत्त्वज्ञानाच्या आधारे भारताच्या स्वातंत्र्याची चळवळ यशस्वी करतानाच गांधीजी म्हणतात, "मी हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी जरी मरायला तयार असलो तरीही माझी देशभक्ती निवडकांसाठी राखीव असणार नाही तर याचा फायदा जगातील सर्व दुर्बल घटकांना झाला पाहिजे. माझ्यासाठी देशभक्ती म्हणजे मानवता होय. हिंदुस्थानची सेवा करण्यासाठी मी इंग्लंड किंवा जर्मनीला हानी पोहोचविणार नाही. माझ्या राष्ट्रवादात पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांविषयी प्रेमाचा समावेश आहे." हिटलरने केलेल्या ज्यू च्या छळाविरोधी शस्त्राचा अवलंब करून त्याचा पराभव केला पाहिजे, ही त्यांची ज्यूंच्या विरोधी झालेल्या हिंसाचारा बद्दलची भावना होती, तरीही ज्यूंना पॅलेस्टाईन वर लादणे त्यांना कधीही पसंत नव्हते. त्यांची अहिंसा शूराची होती. चरख्याच्या आंदोलनातून त्यांनी ब्रिटिशांचे आर्थिक कंबरडे मोडले होते. अशा या महान गांधीजींवर जगात लाखो ग्रंथ लिहिले आहेत, शेकडो देश त्यांना आदर्श मानून आपले स्वातंत्र्य उपभोगत आहेत. इथे त्यांचे चरित्र न सांगता त्यांची प्राण जाय पर वचन न जाय' या मानसिकतेतून आयुष्य जगण्याच्या पद्धतीवर थोडा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. उदा. एका वर्षासाठी दक्षिण आफ्रिकेत गेलेले गांधीजी तेथील भारतीयांच्या हक्कासाठी लढताना 22 वर्षे तिथेच पाय रोवून उभे राहतात व लढा यशस्वी झाल्यानंतरच भारतात परत येतात सात दिवसांसाठी चंपारण्यला गेलेले गांधीजी तिथे सात महिने थांबून, हजारो शेतकऱ्यांच्या समस्या दूर करूनच परत येतात. स्वातंत्र्यलढ्याचे अगोदरचे स्वरूप बदलून लाखो-करोडो भारतीयांचा सर्वसमावेशक लढ्यामध्ये रूपांतरित करतात. भारतातील अस्पृश्यता दूर करण्यासाठी वीस हजार किलोमीटरची' अस्पृश्यता निर्मूलन यात्रा' काढतात व सनातनींच्या आक्रमणाला, हल्ल्याला बळी पडतात... परंतु शेवटपर्यंत सर्व जाती-धर्मातील लोकांना भारतीय म्हणून एकत्र बांधण्याचा प्रयत्न करतात.. 15 ऑगस्ट 1947 ला जेव्हा करोडो भारतीय स्वातंत्र्य दिनाचा आनंद लुटत होते तेव्हा.. गांधीजी नोवाखलीमधील दंगलग्रस्त पीडितांचे दुःख दूर करत होते. दिल्लीत आल्यानंतर त्यांनी फेब्रुवारीमध्ये पाकिस्तानला जाऊन तेथील हिंदूवरील होणाऱ्या अत्याचारा विरुद्ध आवाज उठवण्याचे ठरविले होते. परंतु दुदैवाने त्यांची 30 जानेवारीला हत्या झाली.... अशा दिशेने या ग्रंथाचे लेखन केले आहे. 'Give to the World the best you have and best will come to you' जय हिंद।
Share
