Manus ani Man By Dr. Sanyogita Nadkarni (माणूस आणि मन)
Manus ani Man By Dr. Sanyogita Nadkarni (माणूस आणि मन)
Couldn't load pickup availability
माझं चुकतंय का?
हा अहंकार आहे का?
माझी चूक नसताना मी का ऐकून घेऊ?
मला नाही जमत, काय करू?
शेवटी माझ्याकडेच यावं लागलं ना!
रागावल्याशिवाय कामं होत नाहीत.
यांना धडा शिकवल्याशिवाय कळणार नाही
मीच नेहमी का सहन करायचं?
होत कसं नाही... झालंच पाहिजे!
लोक काय म्हणतील?
मला काही फरक पडत नाही!
मी मी आणि मी! मीला सावरता येत नाही आणि आवरताही येत नाही... मीचं काही करता येत नाही, पण मीचं कोडं सुटलशिवाय पुढं जाताही येत नाही!
कोडं सुटणार कसं? मी कळला, तर कोडं सुटेल. मी कळेल कसा? मी कळवून घेण्यासाठीच हा पुस्तक प्रपंच! पण ‘प्रपंच’ म्हटल्याने घाबरून जाऊ नका. तो आपल्या मनाच्या गुंत्याइतका अवघड नाही. उलट गुंता सोपा करणारा आहे.
किचकट संज्ञा आणि कठीण आकृत्या म्हणजे मन नाही... आपलं वागणं म्हणजे आपलं मन! आपल्यासारखी वागणारी, विचार करणारी आणि रागावणारीसुद्धा माणसं आपल्याला या पुस्तकात भेटतील... अगदी आपण आपल्यालाच भेटू तशी!
आणि ती तशी का वागतात... खरंच ती मुळातून (की आपण) भित्री, चिडकी, बेरड, लबाड, नीरस असतात का? पृथ्वीच्या पोटाप्रमाणे मनाच्याही पोटात स्वभावाची काही रहस्यं दडली आहेत का? आणि असतील, तर ती सोडवायची कशी?
या सगळ्या आणि याशिवाय इतरही अनेक प्रश्नांची उत्तरं आणि स्वत:ला समजून घेण्याचे साधे-सोपे मार्ग आपल्याला या पुस्तकात भेटतील. ते आपल्याला चूक-बरोबर ठरवणारे नाहीत; उलट मित्रासारखे मन हलकं करणारे आहेत.
Share
