Manshuddhichi Perni By Indrajeet Deshmukh ( मनशुद्धीची पेरणी )
Manshuddhichi Perni By Indrajeet Deshmukh ( मनशुद्धीची पेरणी )
Couldn't load pickup availability
महाराष्ट्रातील वारकरी संतांनी अध्यात्मसाधनेत मनावर संयम मिळवण्यावर महत्त्वपूर्ण भर दिला. देवाच्या प्राप्तीसाठी आणि आत्मिक शांतीसाठी मनावरील नियमन महत्त्वाचे असल्याचे आपल्या अभंगांतून आणि ओवीतून त्यांनी वारंवार सांगितले. संतांची हीच वैचारिक परंपरा पुढे घेऊन जाण्याचे महत्त्वाचे काम डॉ. इंद्रजीत देशमुख (काकाजी) करत आहेत.
प्रस्तुत मनशुद्धीची पेरणी या पुस्तकात काकाजींनी ‘मन माझे चपळ’ या मनाच्या प्राथमिक स्तरापासून ते ‘मन हे मीचि करी’ या मनाच्या अंतिम पायरीवर पोहोचण्यासाठी कराव्या लागणाऱ्या विविध प्रयोगांचा समावेश केला आहे. हे सर्व प्रयोग अर्थातच संतवचनांवर आधारित आहेत. संत ज्ञानेश्वरांपासून ते संत कबीर, संत तुकाराम या संत मांदियाळीबरोबरच मिल्टन, शेक्सपियर या पाश्चात्त्य अभ्यासकांचे अनेक दाखले आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतात. संतांच्या मार्गाने, मन या साधनाने याच शाश्वत आनंदाचा काकाजींनी घेतलेला शोध वाचण्यासारखा आहे.
Share
