Manovikas Tarkhadkar English Course By V. P. Kaamatkar (मनोविकास तर्खडकर इंग्लिश कोर्स)
Manovikas Tarkhadkar English Course By V. P. Kaamatkar (मनोविकास तर्खडकर इंग्लिश कोर्स)
Couldn't load pickup availability
र्खडकर भाषांतर पाठमालेचे महत्त्वाचे तिन्ही भाग तुम्ही चांगल्या तन्हेने आत्मसात केले, तर तुम्ही फार मोठी लढाई जिंकल्यासारखे होईल, कारण हे तिन्ही भाग फारच महत्त्वाचे आहेत. इंग्रजीचे मराठी करण्यासाठी आणि मराठीचे इंग्रजी करण्यासाठी जी वाक्ये दिली आहेत, ती पूर्ण धड्यावरील व्याकरणावर आधारित आहेत. ती सोडविण्याचा प्रयत्न करणे म्हणजे हळूहळू इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवणेच होय. तर्खडकर भाषांतर पाठमालेचे तिन्ही भाग विद्यार्थ्यांनी चांगल्या तन्हेने आत्मसात केल्यानंतर, विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेच्या अधिक अभ्यासासाठी कंपोझिशनचा भाग, भाग 'दोन'मध्ये अंतर्भूत आहे. ह्या भाग 'दोन'मध्ये निबंध लेखन, पत्र लेखन, सारांश लेखन, म्हणी, वाक्प्रचार, अलंकार यांचा समावेश आहे. 'तर्खडकर इंग्लिश कोर्स'चा अभ्यास करताना इंग्रजीचे जास्तीत जास्त ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे या दृष्टीने हे प्रयत्न आहेत. मित्रांनो, एकविसाव्या शतकात आपण सर्व जण प्रवेश करणार आहोत. इंग्रजी भाषेने जगावर प्रभुत्व मिळविले आहे. अशा वेळी मी मागे का? तर, 'मला इंग्रजी येत नाही.' मनातील हा न्यूनगंड काढून टाकण्यासाठी 'तर्खडकर इंग्रजी कोर्स' हे पुस्तक तुमच्या हाती देत आहे. ह्या पुस्तकाच्या आधारे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवून तुम्ही एकविसाव्या शतकाला सामोरे जा.
Share
