Skip to product information
1 of 1

Manmohan Sinh By Atul Kahate (मनमोहन सिंह)

Manmohan Sinh By Atul Kahate (मनमोहन सिंह)

Regular price Rs. 191.00
Regular price Rs. 225.00 Sale price Rs. 191.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

मनमोहन सिंह हे भारताच्या अर्थकारणामधलं आणि राजकारणामधलं एक अत्यंत उल्लेखनीय नावकाँग्रेस पक्षाच्या इतिहासात विलक्षण महत्त्वाची कामगिरी करून दाखवणारे आणि २००४ ते २०१४ असं सलग दशकभर देशाचं पंतप्रधानपद सांभाळणारे मनमोहन सिंह यांचं नाव काढताच सगळ्यांच्या मनात आदराची भावना येते१९९१ साली भारताची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक बनलेली असताना तिला नवी दिशा देत स्थिरावण्यासाठीचं अफाट काम पंतप्रधान नरसिंह राव यांच्या साथीनं केलंते मनमोहन सिंहांनीच!

ऑसफर्ड आणि केंब्रिज इथनं उच्चविद्याविभूषित झालेल्या मनमोहन सिंहांनी नियोजन आयोगाचे सदस्य आणि नंतर अध्यक्षरिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरकेंद्रीय अर्थमंत्री आणि पंतप्रधान अशी अत्यंत मानाची पदं सांभाळलीअत्यंत स्वच्छ प्रतिमा जपलेल्या मनमोहन सिंहांच्या साधेपणाचंही सगळ्यांना खूप कौतुक वाटतंपंतप्रधानपदाच्या पहिल्या टप्प्यात खूप यश मिळवल्यानंतर दुसर्या टप्प्यात मात्र मनमोहन सिंहांना अनेक कारणांमुळे खूप टीकेला सामोरं जावं लागलंहा काळ त्यांच्या कारकिर्दीमधला सगळ्यात कठीण काळ ठरला.

मनमोहन सिंह यांचं खासगीतसंच सार्वजनिक आयुष्य अनेक पैलूंमधनं रेखाटणारं हे पुस्तक आहे हे.

View full details