Mangangechya Kathavarti By Dr. Rama Marathe (मनगंगेच्या काठावरती)
Mangangechya Kathavarti By Dr. Rama Marathe (मनगंगेच्या काठावरती)
Couldn't load pickup availability
ऐलतीरी नांदे सुख । पैलतीरावर दुःख ।। मध्ये वाहते जीवन । ऐसे संसाराचे रूप ।। मनःशक्ती ही तर प्रत्येकापाशी असतेच. फक्त तिचा शास्त्रशुद्ध वापर कसा करायचा हे आपण जाणून घेतलं पाहिजे. याबद्दलही आता विविध क्षेत्रात खूप संशोधन झालं आहे. म्हणूनच मनाशी संबंध असलेल्या प्रत्येक गोष्टीशी आपण निदान ओळख तरी करून घ्यायला हवी. आपण मनगंगेची सैर करणार आहोत ती यासाठीच! • तुमचं शरीर तुम्हाला तुमच्या मनःस्थितीविषयी सतत काहीतरी सांगत असतं. कधी प्रेमानं ऐकलंत? विचारपूस केलीत? आजारामागील मनःस्थिती बदला तरच निरोगी व्हाल. • 'कळतं पण वळत नाही.' याचं कारण बऱ्याचदा तुमच्या शरीरातील जीवरासायनिक क्रियांमध्ये आणि म्हणूनच आहारात आणि तुमच्या अंतर्मनात दडलेलं असतं. • भावनिक बुद्ध्यांक प्रयत्नांनी बदलता येतो, वाढविता येतो. तुमचं सुख आणि यश भावनिक बुद्ध्यांकावर ऐंशी टक्के अवलंबून असतं. • स्वतःवर प्रेम करायला शिकणं म्हणजे स्वार्थ नव्हे; उलट ज्या व्यक्तींना असं स्वतःवर प्रेम करणं जमत नाही, स्वतःचा दोषांसकट स्वीकार करणं जमत नाही ते भुकेले राहून आत्मप्रेमाची भरपाई स्वार्थी कृतींनी करू पाहतात. • आपलं शरीर हा आपल्या मनःस्थितीचा अंतर्यामीचा आरसा असतं. सध्या ७०% आजार प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या तणावग्रस्ततेमुळं आहेत. तणावमुक्ती हाच एकविसाव्या शतकातील आरोग्यमंत्र होय.
Share
