Mandakini - मंदाकिनी | By V. S. Khandekar
Mandakini - मंदाकिनी | By V. S. Khandekar
Couldn't load pickup availability
कीर्ती, संपत्ती, संस्कृती, इत्यादिकांच्या मागे धावून मिळणारी सुखे ही गाण्यातल्या लांबलचक तानांसारखी असतात. ती बुद्धीला झुलवितात, पण हृदयाला हलवू शकत नाहीत. उलट दररोजच्या साध्यासुध्या आयुष्यक्रमातील इवलीइवली सुखे ही गायनातल्या लहान लहान मुरक्यांप्रमाणे वाटतात. त्यांच्यामुळेच जीवनसंगीताला अवीट गोडी प्राप्त होते, असे मला तरी वाटते. आपला एखादा मित्र आजारी असला, तर त्याच्याकरता आपण काही मुंबईहून विमानाने बडे बडे डॉक्टर आणू शकत नाही; पण त्याला भेटायला जाताना एखादे टपोरे गुलाबाचे फूल घेऊन जाणे तरी आपल्या स्वाधीन आहे की नाही? आपला मित्र कवी नसला किंवा कुठल्याही वस्तूवर एखादे प्रतीक लादून गूढगुंजन करणाNया कादंबऱ्यांचा त्याला कंटाळा येत असला, तरीही त्या गुलाबाच्या फुलाकडे पाहून त्याच्या मुद्रेवर स्मितरेषा चमकल्याशिवाय राहणार नाही. जणूकाही ते फूल त्याला मूकसंदेश देत असते – हास, जरा हास. काल आणि उद्या हे भास आहेत. जगात सत्य एकच आहे. आज – हा दिवस – ही घटका – हा क्षण!