Manachi Shakti Kashi Vapral By Manoj Ambike (मनाची शक्ती कशी वापराल)
Manachi Shakti Kashi Vapral By Manoj Ambike (मनाची शक्ती कशी वापराल)
'तुम्हाला त्याच गोष्टी मिळतात, ज्या गोष्टी तुम्हाला मिळतील असा तुमचा विश्वास असतो,' असा संदेश देणारे हे मनोज अंबिके यांचे हे पुस्तक मनाचे कार्य, मन:शक्तीचां योग्य वापर आदिंसंदर्भात मार्गदर्शन करते. मन कुठे असतं?, माझे मन कसं काम करतं?, दिसतं तसं नसतं, अशी जन्म घेते इच्छाशक्ती, जसा विश्वास तसेच फळ, पण परंतूची जादू, आकर्षणाचा नियम, मनाचे प्रोग्रामिंग, स्वयंसूचना-विचारशक्ती, मनाची शक्ती कशी वापरावी? आणि प्रतिक्रिया हेच प्रोग्रामिंग अशा ११ प्रकरणांमधून हा विषय स्पष्ट करण्यात आला आहे. मनाची शक्ती जाणण्यासाठी तीन रहस्ये पुस्तकात दिली आहेत. शक्तीचा योग्य दिशेने कसा वापर करायचा, यासाठी सात सिद्धांत आहेत, तर ११ नियम आहेत. मनाच्या शक्तीचे नियम पाळलेत, तर हवे ते प्राप्त होईल, असे लेखक सांगतात.
प्रत्येक गोष्ट दोनदा तयार होते. आधी तुमच्या मनात... मगच वास्तवात
* तीन रहस्ये
* सात सिद्धांत
* अकरा नियम
* शब्दांची शक्ती
* विश्वासाचे सामर्थ्य
* हवे ते कसे मिळवाल?
* अंतर्मनाद्वारे आजारांवर मात
* अशांत मन शांत कसे कराल?
* मन कुठे असते व ते कसे काम करते?
* अंतर्मनाचे प्रोग्रॅमिंग करायच्या पद्धती
* नकारात्मक विचार थांबवण्याच्या पद्धती