Skip to product information
1 of 1

Manache Vyavasthapan By Chandrashekhar Pande

Manache Vyavasthapan By Chandrashekhar Pande

Regular price Rs. 213.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 213.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

शारीरिक स्वास्थ्य हे आपल्या मनाच्या स्वास्थ्यावर अवलंबून असतं. मानवी सुख-दु:ख आणि वैयक्तिक परिणामकारकता निर्धारित करण्यात परिस्थिती नव्हे, तर त्याकडे बघण्याचा व्यक्तीचा दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. माणसाच्या आयुष्यात भावना आणि त्यांच्याशी निगडीत त्याच्या वर्तनाला अनन्यसाधारण महत्त्व असतं. प्रेम, आनंद, विनोद इ. भावना जगण्यातलं सुख वाढवतात; पण त्यांचा अतिरेकही घातकच असतो. म्हणूनच निसर्गाने भीती, राग, विषण्णता, शोक अशा नकारात्मक भावनाही माणसाच्या मागे लावल्या असाव्यात. या भावना व्यक्तीला अस्वस्थ करतात, व्यक्तीच्या कार्यक्षमतेवरही परिणाम करतात. तेव्हा या भावनांचे गुलाम न बनता त्यांचं म्हणजेच मनाचं व्यवस्थापन कसं करायचं हे सांगणारं मार्गदर्शक पुस्तक.
समुपदेशक, अधिकृत आरईबीटी मानसोपचारतज्ज्ञ. 50 वर्षांहूनही अधिक काळ मानसशास्त्र क्षेत्रात कार्य. जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ, लेखक आणि आरईटीचे (रॅशनल इमोटिव्ह थेरपी) जनक डॉ. अल्बर्ट एलिस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण आणि आरईबीटी मानसोपचारतज्ज्ञ म्हणून मान्यता प्राप्त. स्थिरपणे आणि यशस्वीपणे शैक्षणिक क्षेत्रातही कार्य. समाजातील अंधश्रद्धेच्या प्रश्नाबाबत कृतिशील असणारे लेखक, समुपदेशक आणि मानसोपचारतज्ज्ञ.

View full details