Manacha Podcast Part 1 | Dr. Anand Nadkarni Sanwadak (मनाचा पॉडकास्ट भाग १ । डॉ. आनंद नाडकर्णी)
Manacha Podcast Part 1 | Dr. Anand Nadkarni Sanwadak (मनाचा पॉडकास्ट भाग १ । डॉ. आनंद नाडकर्णी)
Couldn't load pickup availability
मनाचा पॉडकास्ट भाग १
रिमा - आनंदकाका, मला सांग, या मनाचं करायचं काय रे? विचारांच्या
या गुंत्याला सोडवायचं कसं? मेंदू आणि मन एकच ना रे? आणि या भावना
बघ ना, कुठे कुठे ओढत नेतात. मन, मेंदू, विचार आणि भावना यांची सांगड
कशी घालू? मनातल्या अनाम भितीला पळवून कसं लावू?
डॉ. आनंद नाडकर्णी - हे सगळे प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये येतच असतात.
काम करताना, काम न करताना... झोपेत आणि जागं असतानासुद्धा आणि
खूप जण मला हे प्रश्न विचारतच असतात. तेव्हा आपल्या कार्यक्रमाच्या
निमित्तानं देऊनच टाकू या, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं. क्या बोलती तू?
रिमा - अर्थात येस्स! आणि म्हणूनच मी रिमा सदाशिव अमरापूरकर आणि
मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी तसेच ईपीलॉग मिडिया आपल्या
सगळ्यांसमोर घेऊन आलो आहोत ‘मनाचा पॉडकास्ट’. न दिसणाऱ्या
आपल्या कंट्रोलरला, म्हणजेच मनाला जाणून घेऊ यात. कारण मनाला
जाणणं म्हणजेच स्वत:ला जाणणं.
तब्बल साठ भागांची ही श्राव्यमालिका, जगभरातील लाखो श्रोत्यांसाठी
भावनिक आरोग्य जपण्यासाठीचे ऑडिओ जर्नल बनून गेली आहे.
श्रोत्यांच्या मागणीमुळे या मौखिक प्रयोगाचे हे पुस्तकरूप वाचकांसमोर
येत आहे. मूळ संवादातली उत्स्फूर्त सहजता जशीच्या तशी ठेवून!
Share
